मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंधेरी मतदारसंघात भाजपा-शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदावर ऋतुजा रमेश लटके यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. मात्र, प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतली असली, तरीही अद्याप त्या मतदार संघात आणखी ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रचार करून विजयाचा भगवा फडकण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना ६ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अंधेरी मतदार संघातील आताची लढत
- ऋतुजा रमेश लटके – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- बाळा व्यंकटेश विनायक नाडार – हिंदुस्थान जनता पार्टी
- मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी
- निना खेडेकर – अपक्ष
- फरहान सिराज सय्यद – अपक्ष
- मिलिंद कांबळे – अपक्ष
- राजेश त्रिपाठी – अपक्ष