Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई-पुणे महामार्गासह देशभरात ९ महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्स!

ई-कारसाठी महामार्गांवर ६ हजार चार्जिंग स्टेशन्स!

November 29, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
NHAI

मुक्तपीठ टीम

देशातील प्रमुख द्रुतगती मार्ग आणि महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार आहे. केंद्र सरकारने ९ द्रुतगती मार्गांवर ६ हजार चार्जिंग स्टेशन बसवण्यास मंजुरी दिली आहे. तीन हजार स्थानके उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्याच वेळी, सरकार प्रगत केमिकल सेल म्हणजेच एसीसी भारतात तयार करण्याचा विचार करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण उत्पादन खर्चापैकी ३० टक्के केमिकल सेलचा वाटा आहे. जर ते देशात बनवले जाऊ लागले तर इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल.

 

मुंबई-पुणे महामार्गासह देशभरात ९ महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्स!

  • अवजड उद्योग मंत्रालयाची चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना तयार आहे.
  • नऊ महामार्गांमध्ये मुंबई-पुणे, दिल्ली-आग्रा, आग्रा-लखनौ, अहमदाबाद-बडोदा, बेंगळुरू-म्हैसूरू, बेंगळुरू-चेन्नई आणि ईस्टर्न पेरिफेरल यांचा समावेश आहे.

 

बॅटरी स्वदेशीच झाली तर स्वस्त होतील ई-कार!

  • त्याच वेळी, एसीसी बॅटरीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर, इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च कमी होईल.
  • या सेलची निर्मिती शक्य आहे कारण बॅटरीमध्ये वापरण्यात येणारा ७० टक्के कच्चा माल भारतात उपलब्ध आहे.
  • अवजड उद्योग मंत्रालयाने त्याच्या निर्मितीसाठी इच्छुक कंपन्यांकडून अर्जही मागवले आहेत.

 

आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची वाढ

  • इलेक्ट्रिक वाहनांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के तर, चार्जर आणि चार्जर स्टेशनवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के केला.
  • ऊर्जा मंत्रालयाने चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मानक जारी केले आहेत. निवासस्थान आणि कार्यालयांमध्ये खाजगी चार्जिंगला परवानगी आहे.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले की, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना ग्रीन लायसन्स प्लेट्स देण्यात येतील. त्यांना परमिट घेण्याची गरज भासणार नाही.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांना इलेक्ट्रिक वाहनांवर ट्रोल कर लागू न करण्याचा सल्ला दिला आहे.
  • ई-वाहन पोर्टलनुसार, २०१९ मध्ये नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १ लाक ६१ हजार ३१४ आणि २०२० मध्ये १ लाख १९ हजार ६४८ आहे.

 

गेल्या तीन वर्षांतील विक्री

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते, १९ जुलै २०२१ पर्यंत देशात गेल्या तीन वर्षांत नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ५ लाख १७ हजार ३२२ आहे.
  • ई-वाहनांची विक्री गेल्या तीन वर्षांत नॉन-इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत सुमारे १ टक्‍के झाली आहे.
  • याशिवाय, २० जुलै २०२१ पर्यंत देशात हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारत योजनेच्या फेज-२ अंतर्गत ८७ हजार ६५९ ई-वाहनांना मदत करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: charging stationE-vehicle charging stationelectric carelectric vehicleExpresswayIndiaMumbai-Pune highwayNHAIइलेक्ट्रिक वाहनई-वाहन चार्जिंग स्टेशनईलेक्ट्रिक कारचार्जिंग स्टेशनद्रुतगती मार्गभारतमुक्तपीठमुंबई-पुणे महामार्ग
Previous Post

श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कॉरिडॉर आकारला, लवकरच उद्घाटन!

Next Post

नेक्सझू मोबिलिटीची कल्पना भन्नाट, ईलेक्ट्रिक सायकल थेट घरी डिलिव्हर होणार!

Next Post
nexzu

नेक्सझू मोबिलिटीची कल्पना भन्नाट, ईलेक्ट्रिक सायकल थेट घरी डिलिव्हर होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!