Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फक्त १२ रुपयात घर, जीवन नव्यानं सुरु करण्यासाठी लाखोंची मदत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
GNM (1)

मुक्तपीठ टीम

स्वप्न वाटावं असंच सारं. पण तसं प्रत्यक्षात आहे. एक सरकार सांगतेय. या आमच्याकडे स्थायिक व्हा. फक्त बारा रुपयात तुम्हाला घर दिले जाईल. एवढंच नव्हे तर तुम्हाला त्या देशात नव्यानं जीवन सुरु करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत म्हणून तीन लाखाची मदतही केली जाईल. अर्थात लोकसंख्या अगडबंब असलेल्या आपल्या देशातील ही बातमी नसून परदेशातील आहे, हे तुम्ही ओळखलं असेलच!

GNM 1 (3)

युरोपातील क्रोएशियामध्ये १५०० चौरस फूट भागात पसरलेली घरे अवघ्या १२ रुपयांना विकली जात आहेत. खरं तर, क्रोएशियाच्या उत्तरेकडील भागात लेग्राड नावाचे एक शहर आहे. हे शहर ६२ चौरस किमीवर पसरलेले आहे. सहसा भारतात इतक्या मोठ्या भागात पसरलेल्या शहराची लोकसंख्या लाखोंमध्ये असते. परंतु सध्या या शहरात फक्त २२४१ लोक राहतात.

GNM 1 (4)

लेग्राडचे महापौर इव्हान साबोलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शहरात वाहतुकीची कोणतीही समस्या नाही. शहरातील लोकसंख्या कमी होऊ नये, म्हणून रिकामी घरे फक्त १२ रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत १७ घरे विकली गेली आहेत. परंतु ही घरे खरेदीदारांना करार करूनच विकली जात आहेत. त्याअंतर्गत खरेदीदारांना किमान १५ वर्षे या शहरात राहावेच लागणार आहे.

GNM 1 (1)

लेग्राडची सीमा हंगेरीशी जोडलेली आहे. सर्वत्र जंगल आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी अ‍ॅस्ट्रो आणि हंगेरियन साम्राज्य फुटल्यानंतर इथली लोकसंख्या कमी होत गेली. अलीकडेच १९ कुटुंबे आपली घरे सोडून राजधानी झाग्रेब येथे स्थलांतरित झाली आहेत. यातील काही घरे मोडली आहेत. कोणाला ही घरे खरेदी करायची असतील तर प्रशासन त्यांच्या खर्चाने घरांची दुरुस्तीही करेल. याशिवाय येथे नवीन जीवन सुरू करण्यासाठी ३ लाख रुपये देखील दिले जातील.

GNM 1 (5)

इव्हान सबोलिक म्हणाले की, “ही घरे फुकट मिळाण्यासारखी आहेत. लोक येथे येतात, परंतु थोड्या वेळाने ते तिथून निघून जातात. म्हणूनच, घर खरेदीदारांना १५ वर्षांचा करार करावा लागेल. जेणेकरून लोक येथेच राहतील, त्यामुळे शहर लोकांनी भरलेले दिसू शकेल.

GNM 1 (2)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: croatiaEuropeइव्हान साबोलिकक्रोएशियायुरोपलेग्राड
Previous Post

आज राज्यात १० हजार नवे रुग्ण, ७ हजार बरे झाले! बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांजवळ!! 

Next Post

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींसोबत मुख्यमंत्रीही मैदानात

Next Post
GNM (2)

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींसोबत मुख्यमंत्रीही मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!