मुक्तपीठ टीम
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) ही कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत जागतिक स्तरावर सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक आहे. ईएससीआय साधारणतः १३ कोटी (१३० दशलक्ष) भारतीयांना प्रामुख्याने आजारपणाचे फायदे आणि काही इतर फायदे प्रदान करते ज्यात विमा उतरवलेले कर्मचारी आणि त्यांच्या आश्रितांचा समावेश आहे. याशिवाय गरोदरपणात महिलांना ईएससीआय योजनेतून भरपूर आर्थिक सहाय्य आणि फायदे मिळतात. ईएससीआय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी एक ट्विट देखील केले आहे.
ईएसआयसीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “महिलांना प्रसूतीदरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा प्रसूती रजेदरम्यान पगाराचा प्रश्न येतो, तेव्हा ईएसआयसी त्याचीही पूर्ण काळजी घेते. ईएसआयसी म्हणजे काळजीपासून मुक्तता.”
ईएससीआयच्या ट्विटनुसार, या योजनेअंतर्गत प्रसूती रजेदरम्यान, विमाधारक महिला सदस्यांना २६ आठवड्यांसाठी दैनंदिन वेतनाच्या १०० टक्के रक्कम दिली जाते. या योजनेशी संबंधित इतर माहिती आणि त्याच्याशी संबंधित लाभांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी महिला www.esic.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत.
योजनेचे इतर फायदे
- प्रसूती रजेव्यतिरिक्त, ही योजना वैद्यकीय खर्च, हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, बेरोजगारीचे फायदे, अपंगत्व, नोकरीदरम्यान झालेल्या दुखापतींसाठी आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते.
- विमाधारक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही, मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.
- सेवानिवृत्त आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदारांना वार्षिक प्रीमियम रक्कम १२० रु. भरून वैद्यकीय सेवा देखील दिली जाते.
- मासिक पगाराचा एक छोटासा भाग कर्मचारी आणि त्याच्या नियोक्त्याने ESIC योजनेसाठी द्यावा लागतो.