Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कामगार विमा योजनेतील सदस्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना दरमहा पेन्शन!

अधिसूचना जारी, कामगार मंत्रालयाने सूचना मागितल्या

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ESIC

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात कामगार मंत्रालयाने ईएसआयसी सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यास ईएसआयसी सदस्यांच्या आश्रितांना किमान १८०० रुपये दरमहा पेन्शन मिळेल. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून या योजनेसंदर्भात महिन्याभरात सूचना मागविल्या आहेत.

 

कर्मचारी राज्य विमाधारकांनंतर आश्रितांना पेन्शन

  • कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ईएसआयसी कोविड रिलीफ स्किमला अधिसूचित केले आहे.
  • ईएसआयसी कायद्याच्या कलम १९ अंतर्गत या योजनेस अधिसूचित करण्यात आले आहे.
  • मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की या योजनेंतर्गत कोरोनामुळे विमाधारकाच्या मृत्यूवर मदत उपायांची तरतूद करण्यात आली आहे.
  • योजनेंतर्गत, विमा उतरलेल्या व्यक्तीची कोरोना झाल्याच्या तीन महिन्यांपूर्वी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी झालेली असली पाहिजे.

 

संसर्ग झाल्यावर नोकरीवर असले पाहिजे

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी, कोरोनाने मृत झालेला व्यक्ती नोकरीवर असायला पाहिजे.
  • अधिसूचनेनुसार मृतांच्या पात्र कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात मदत रक्कम थेट दिली जाईल.

 

सरासरी रोजंदारीच्या ९०% वेतन मिळेल

  • योजनेंतर्गत, दरमहा सरासरी ९०% वेतन कुटुंबाच्या सदस्यांना विमाधारकाच्या मृत्यूवर दिलासा म्हणून दिला जाईल.
  • यापैकी पत्नीला आयुष्यासाठी दरमहा एकूण ३ टक्के रक्कम मिळेल.
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत मृत्यू झाल्यासही या योजनेचा लाभ मिळू शकेल.
  • कोरोनाच्या उपचारादरम्यानही पगार मिळेल.
  • ईएसआयसी कायद्यांतर्गत विमा उतरलेल्या कर्मचार्‍यांना आजाराच्या उपचारादरम्यानही पगार मिळण्याची तरतूद आहे.

 

कोरोना उपचारादरम्यान पगार मिळणार

  • तसेच कोरोना उपचारादरम्यान कर्मचार्‍यांना पगार देण्यात येणार आहे.
  • हा पगार सरासरी दैनिक वेतनाच्या ७०% आधारावर दिला जाईल.
  • याचा फायदा घेण्यासाठी कर्मचार्‍यास नियुक्त केलेल्या शाखेत दावा करावा लागेल.
  • हा हक्क ७ दिवसात निकाली निघतो.
  • हक्कासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

अंत्यसंस्कारासाठी १५,००० रुपये उपलब्ध आहेत

  • विमाधारकाच्या मृत्यूच्या वेळी, त्याच्या अंत्यविधीसाठी १५,००० रुपये ईएसआयसीद्वारे दिले जातात.
  • ईएसआयसी कायद्यांतर्गत मृत्यूच्या दिवशी कर्मचार्‍याचा विमा उतरवणे आवश्यक आहे.
  • यासाठी दावा कर्मचार्‍यांसाठी नियुक्त केलेल्या शाखेत केला आहे.
  • हा हक्क ७ दिवसात निकाली निघतो.

Tags: ESICpensionईएसआयसीकर्मचारी राज्य विमाधारककामगार मंत्रालयपेन्शन
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक १३४ वर्षांचे झाले…

Next Post

जुलैपासून पावसाळी अधिवेशनाची तयारी, ४४५ खासदारांचे लसीकरण!

Next Post
par1

जुलैपासून पावसाळी अधिवेशनाची तयारी, ४४५ खासदारांचे लसीकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!