*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे. 2) ‘बिग बॉस’ १४ मधील गायक राहुल वैद सध्या चांगलाच चर्चेत आहे. राहुल वैद्यने या शोच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकली. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत एक फोटो शेअर केला आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्जॉय करताना दिसत आहे, त्यामुळेल सध्या ते चर्चेत आहेत. 3) अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी राशा थडानी हिच्या सोबतच फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशाने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 4) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 5) अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये निशा वडिल डॅनियल वेबरला पाहून पळत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. यामुळे सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा आहे.