मुक्तपीठ टीम
यूपीएससी(२०२१) मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग (श्रेणी १), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (श्रेणी २), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (श्रेणी ३), इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (श्रेणी ४) या पदासाठी ही पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार, या संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे असावे.
शुल्क
ही परीक्षा देणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.