Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिग्रसच्या ग्रामीण महिलांना अगरबत्तीच्या काड्यांचा आधार! अगरबत्ती उद्योगातून शेकडोंना रोजगार!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Digras

प्रसाद नायगावकर / यवतमाळ

महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काय होऊ शकते हे दिग्रस तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी दाखवून दिले आहे. माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने बचत गटाच्या महिलांनी अगरबत्तीचा उद्योग सुरू केला. नामांकित ब्रँड असल्याने या उद्योगाने अल्पावधीतच भरारी घेतली. या उद्योगामुळे २०० महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायकल ब्रँड या नामांकित कंपनीसोबत करार करण्यात आली आला. महिलांना प्रोत्साहन देत दीड कोटी रुपयांचा निधी बांबू विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिला आहे.

 

दिग्रस तालुक्यात आणि शहरात कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग नसल्याने महिलांना शेती आणि इतर उन्हातील कामे करावी लागत होती. त्यांना नियमित रोजगार देखील मिळत नव्हता,अशा वेळी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड वनमंत्री असताना वनविभाग,बांबू विकास महामंडळ यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकित ब्रँड कंपनीसोबत करार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने एक कोटी ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून शंभर मशीनची खरेदी करण्यात आली. पाचशे महिलांना रोजगार मिळावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सुरुवातील २०महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यवतमाळ अगरबत्ती प्रकल्प दिग्रस येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू आहे. दोनशे ते अडीजशे महिलांना नियमित रोजगार मिळत असून, दिवसाला एका महिलेला अडीजशे ते तीनशे रुपये प्रतिदिन प्रमाणे रोज पडतो. त्यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. नामांकित ब्रँड ही कंपनी कच्चा माल पुरवठा करते, त्यावर महिला प्रक्रिया करून अगरबत्ती बनवतात. हा उद्योग यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांचे प्रयत्न सुरू आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: agarbatti industryDigrasemploymentFormer Minister and MLA Sanjay Rathoregood newsincense sticks industrymuktpeethrural womenYavatmal Agarbatti Projectअगरबत्ती उद्योगग्रामीण महिलाचांगली बातमीदिग्रसमाजी मंत्री तथा आमदार संजय राठोडमुक्तपीठयवतमाळ अगरबत्ती प्रकल्परोजगार
Previous Post

राज्यात ४६० नवे रुग्ण,  ७१८ रुग्ण बरे!

Next Post

अॅमिटी युनिव्हर्सिटीत उद्योग, व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Next Post
Amity University Womens day

अॅमिटी युनिव्हर्सिटीत उद्योग, व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!