मुक्तपीठ टीम
नौदलातील लेफ्टनंट युद्धी सुहाग यांना यावेळी ‘निशाण अधिकारी’ होण्याचा मान मिळाला. ‘किलर्स’ तुकडीने ५० वर्षे देशाची, नौदलाची सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना ‘प्रेसिडेंंट फ्लॅग’ सुपूर्द केला. या कार्यक्रमात नौदल बँडचे प्रमुख मास्टर चिफ पेटी आॅफिसर (एमसीपीओ) अँॅथनी राज हे नौदलातील बँडवादक सैनिकांचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्या सुचनांनुसार बँडवादकांनी राष्ट्रगीताची धुन तसेच राष्ट्रपतींच्या आगमनावेळी वाजवला जाणारे सुमधूर बँडवादन, अंतिमवेळी सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याची धून वाजवली. जी सर्वांच्या मनाला भिडली. हेलावून गेली.
- नौदलातील ३३ सैनिकांनी यावेळी कंटिंजन्सी ड्रिलच्या अत्यंत शानदार कवायती दाखवल्या आणि सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी ‘स्वर्णिम’ म्हणजेच ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सैनिकांनी ५० हा आकडा मानवी आकृतीतून सादर केला. त्यांच्या या कल्पनेला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
- नौदलाच्या ताफ्यातील चेतक, रशियन बनावटीच्या कमॉव्ह, एएलएच ध्रुव आणि सी किंग या हेलिकॉप्टर्सनी विविध कठीण कवायती सादर करुन, उपस्थितांना चकीत केले. नौदलातील कमांडो अशी ओळख असलेल्या ‘मार्कोस’नी खोल समुद्रात सापडलेल्या , बुडणा-यांचे जीव वाचवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
२२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स’युद्धनौकेच्या तुकडीसाठी विविध धर्मगुरुंकडून विशेष प्रार्थना
भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या २२ व्या ‘व्हेसल स्क्वॉड्रन्स’ युद्धनौकेच्या तुकडीसाठी ब्राह्मण, मौलवी, शिख आणि फादर या विविध धर्मगुरुंकडून विशेष प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व अन्य अधिकारी, त्यांचे कुटुंबियांच्या समोर ही प्रार्थना झाली. महत्वाचे म्हणजे असे की, हे चौघेही धर्मगुरु नौदलाच्या सेवेत आहेत. अशा महत्वाच्या प्रसंगांवेळी हे धर्मगुरु आपापल्या भाषेत विविध प्रार्थना करुन, सदा सर्वदा आशिर्वाद शुभेच्छा देतात. बुधवारी हा नौदल समारंभ सुरु होण्याच्या ब-याचआधी हे धर्मगुरु स्थापनापन्न झाले होते. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर काहीवेळाने ब्राह्मण गुरुजींनी संस्कृत स्तोत्रांचे वाचन करुन सदा सर्वदा आशिर्वाद आणि ओम शांती शांती अशा शुभेच्छा दिल्या. तर मौलवींनी बिस्मिल्ला केला तर शिख गुरुंनी गुरु नानक यांची धार्मिक वचने वाचली तर फादरनीही इंग्रजीत प्रार्थना करुन नौसेना अधिकारी आणि सैनिकांना सुयश चिंतीले.