मुक्तपीठ टीम
देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने डबल डोस कोरोना लस जारी केल्या. मात्र आता सिंगल डोस कोरोना लसही भारतात दिली जाणार आहे. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलच्या तज्ज्ञ समितीने रशियाच्या स्पुटनिक लाइट लसीच्या सिंगल डोसला मान्यता दिली आहे. भारतात सध्या रशियाच्या स्पुटनिक व्ही कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आलेली आहे.
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी करण्यात लस उपयोगी
- स्पुटनिक लाइट ही स्पुटनिक व्हीचं पुढचं व्हर्जन असल्याचे म्हटलं जात आहे.
- लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी या लसीचा वापर केला जाऊ शकतो.
- मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे.
- आरडीआयफने दिलेल्या माहितीनुसार स्पुटनिक लाइट लस घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात ही लस डेल्टा व्हेरिएंटवर ७० टक्के प्रभावी ठरली.
- २८००० लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली.
- मॉस्कोमध्ये जुलै २०२१ मध्ये हा अभ्यास झाला.
- ६० पेक्षा कमी वयाच्या लोकांवर ही लस ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असलयाचं दिसून आलं आहे.
- आजाराची तीव्रता कमी करण्यात ही लस मदत करते.
कोरोना तिसरी लाट मंदावतेय
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १६८.४७ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
- गेल्या २४ तासांत ५५ लाख लोकांना लसीकरण करण्यात आले.
- शुक्रवारी देशात १.४९ लाख (१,४९,३९४) नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
- गुरुवारच्या तुलनेत ही संख्या १३ टक्के कमी आहे.
- गेल्या २४ तासांत २,४६,६७४ लोक बरे झाले आहेत.
- शुक्रवारी राज्यात १३,८४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर, २७,८९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- राज्यात शुक्रवारी ८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२६ % एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.