मुक्तपीठ टीम
दिग्गज उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मस्क यांनी ट्विटरचे सुमारे ७ कोटी ३५ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. मस्क यांनी आधी घोषित केल्याप्रमाणे सोशल मीडिया क्षेत्रात प्रवेश करताच आपल्या काही कल्पना पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मस्क लोकांना ‘एडिट बटण’ हवे आहे का असे विचारत आहेत. त्यामुळे एकदा केलेल्या ट्वीटमध्ये काही बदल करायचा असेल तर तो फेसबूक पोस्टप्रमाणे करता येईल. त्यासाठी त्यांनी पोल घेतला आहे. तर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
एडिट बटण हवे आहे का? एलॉन मस्क यांचा पोल!
- मस्कच्या ट्विटरमधील ही भागीदारी निष्क्रिय गुंतवणूक मानली जात आहे.
- याचा अर्थ त्यांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूकदार राहायचे आहे.
- मस्क यांनी ट्विटरवर आल्यानंतर आता त्यांच्या मनातील कल्पना पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.
- त्यांनी एक ट्विटर पोल ट्वीट केला, ज्यामध्ये मस्क यांनी वापरकर्त्यांना एडिट बटण हवे आहे का असे विचारले.
- तत्पूर्वी १ एप्रिल रोजी ट्विटरने त्याच्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट ट्विट केली होती, ज्यात असे म्हटले होते की ते एडिट बटणावर काम करत आहे.
Do you want an edit button?
— Elon Musk (@elonmusk) April 5, 2022
ट्विटरच्या सीईओंचा इशारा
- दरम्यान, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी इलॉन मस्कच्या एडिट बटणावर घेतलेल्या पोलवर लोकांना सावध केले आहे.
- “या मतदानाचा निकाल महत्त्वाचा असेल.
- कृपया काळजीपूर्वक मतदान करा,” ते म्हणाले.