Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

April 5, 2022
in सरकारी बातम्या
0
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हरियाणा राज्यातील पानिपत येथील युद्ध स्मारकाला भेट

मुक्तपीठ टीम

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हरियाणा राज्यातील पानिपत येथील युद्ध स्मारकाला भेट            

हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे याबाबत येथील स्थानिक शासकीय अधिकारी आणि रोड मराठा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून तेथील समस्या डॉ.गोऱ्हे यांनी जाणून घेतल्या.

            

मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता विशेष प्रयत्न करण्याची सूचना यावेळी स्थानिक प्रशासनाला करण्यात आली. या कामासाठी वित्त आयोगाच्या जिल्हा नियोजन अथवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पानिपत येथील स्थानिक अधिकारी यांना दिल्या. स्थानिक जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडून याकरिता प्रयत्न होण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पानिपत स्मारक परिसरात अत्यावश्यक सुविधांबाबत चर्चा            

सद्यस्थितीत स्मारकाची दैनंदिन व्यवस्था चोख असण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रत्येक वर्षी १ लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पर्यटकांच्या व स्मारकाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक म्हणून होम गार्ड यांची नेमणूक करणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, स्वच्छता राखणे, तसेच  स्मारकामध्ये  सीसीटीव्हीची सुविधाही आवश्यक आहे. प्रकाश योजना असलेला लाईट शो, हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुसज्ज कॅन्टीन, युद्धाची आणि इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय या स्मारकाशेजारी उभारावे, ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पुस्तकांचे वाचनालय – ग्रंथालय, पर्यटकांसाठी प्रशिक्षित गाईड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

            

यावेळी हरियाणा रोड मराठा संघटनेचे गुरदयाल सिंग, झिले सिंग, राजेशकुमार चोपडा, बळबिर सिंग कल्याण, भीम सिंग, रामणारायन मराठा, मराठा राजेंद्र शेरा, कमलजीत महाले, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, हरियाणा, मुलतानसिंग महाले, महेंद्र काज, पानिपतचे दंडाधिकारी राजेशकुमार सोनी, पुरातत्व विभागाचे अधिकारी वेदप्रकाश, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी, रवींद्र खेबुडकर, योगेश जाधव, प्रवीण सोनावणे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: Dr.Neelam GorheharyanaPanipatउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेपानिपतमराठा युद्ध स्मारक
Previous Post

“ट्वीटमध्ये बदल करण्यासाठी ट्विटरवर एडिट बटन पाहिजे का?”

Next Post

जेवणावर ताव…पुढे आलं पोट…शर्टाचं बटनंही तुटलं! रितेश देशमुखचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं!

Next Post
Riteish Deshmukh

जेवणावर ताव...पुढे आलं पोट...शर्टाचं बटनंही तुटलं! रितेश देशमुखचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!