मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती पण आता त्यांनी ट्विटर युजर्सची ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली आहे, त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पूर्वी ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंट्सना ब्लू टिक, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनद्वारे देत असे. याशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक्सही दिले आहेत. कंपन्यांच्या सत्यापित खात्यांना सोनेरी रंगाची टिक दिले आहे. पण, एलॉन मस्क यांची नवी घोषणा अनेकांना निराश करणारी ठरू शकते. असा निर्णय का घेतला आहे त्यामागचे कारण जाणून घेवूया…
ट्विटर युजर्सचे ब्लू टिक काढणार!! जाणून घ्या कारण…
- ब्ल्यू टिक हे सत्यापन चिन्ह सांगते की खाते अस्सल आहे.
ते योग्य माहिती देईल. - लोकांना ब्लू टिक चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे.
- सध्या ४ लाखांहून अधिक ट्विटर खात्यांवर ब्लू टिक मार्क आहे.
- नवीन सबस्क्रिप्शन सेवेसह, व्यक्तींना सामाजिक स्थितीपासून वेगळे ब्लू टिक्स दिले जातील.
- आता पैसे भरल्या नंतर ब्लू टिक दिला जाईल.
ब्ल्यू टिकमुळे फटका!
- अनेक चुकीच्या अकाऊंटला ब्लू टिक देखील मिळाली, त्यानंतर त्यांनी फेक न्यूज पसरवण्यास सुरुवात केली.
- त्याचे मोठे नुकसान मूळ कंपन्यांचे होते
- ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन सोबतच अनेक नवीन फीचर्स देखील यूजर्सना दिले जात आहेत.
- युजर्स सध्या iOS किंवा वेबवरून ट्विटर ब्लूसाठी साइन अप करू शकतात.
- ट्विटर ब्लू सदस्यांना एडिट ट्विट, १०८०पी व्हिडिओ अपलोड रीडर मोड, कमी जाहिराती आणि इतर फिचर्स दिले जात आहेत.
- कंपनीने ट्विटर ब्लूसाठी प्रति महिना डॉ ८ शुल्क ठेवले होते.
- अॅपल युजर्ससाठी, हे शुल्क प्रति महिना डॉ ११ आहे.
- ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन शुल्क भारतात जाहीर करण्यात आलेले नाही.
यापूर्वी ट्विटरवर ब्लू टिक फक्त पत्रकार,राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि इतरांना दिली जात होती. आता सर्व आधीच व्हेरिफाईड अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकले जाईल. एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले की काही महिन्यांत सर्व लेगसी ब्लू टिक काढून टाकले जातील.
ज्यांच्याकडे आधीच ब्लू टिक होते ते लिगसी बनले आहेत. म्हणजे ते खाते पूर्वी पडताळले जात होते, आता ते पडताळले जात नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नावावरून ब्लू टिकही काढण्यात येणार आहे.