मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात १२.४१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. टेस्ला आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे मस्क आणि अदानींना हा मोठा धक्का बसला आहे. यासोबतच मुकेश अंबानी यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत आकडेवारी पाहिली तर मस्क, अदानी यांनी भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती गमावल्याचं दिसत आहे.
दोन्ही अब्जाधिशांची संपत्तीत घसरण
- ब्लूमबर्ग बिलिअनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे.
- त्याच्या मालमत्तेत २.११ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १७,४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- त्याच वेळी, टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एका दिवसात १०.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८५,००० कोटी रुपये कमी झाली आहे.
- यासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांचे एका दिवसात ५.९२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
- तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीला एका दिवसात ४.८५ बिलियनचा झटका बसला आहे.
मुकेश अंबानी यांचेही नुकसान
जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ८३.६ अब्ज डॉलर आहे आणि एक दिवसात त्यांची मालमत्ता सुमारे ९३.७ दशलक्ष गमावली आहे.