मुक्तपीठ टीम
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. एकेाळी नक्षलवाद्यांचा अड्डा असलेल्या कमलापूरमध्ये हत्ती कॅम्पमुळे पर्यटकांची गर्दी वाढली. मात्र आता एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी कमलापूर येथील हत्तींना गुजरात येथे हलविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची बाब समोर आली आहे. गुजरातच्या जामनगर भागात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सुमारे २५० एकर जागेत खासगी प्राणिसंग्रहालय उभारण्यात येत आहे. कमलापूर येथील हत्तींना या खासगी प्राणिसंग्रहालयात हलविण्याचा कट रचला जात आहे. याबाबतीत वन्यजीवप्रेमींनी आणि मनसेने तीव्र विरोध केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती शिबीर हे राज्यातील एकमेव पाळीव हत्तीचे शिबीर आहे. या शिबिरात सध्या सात हत्ती असून, त्यापैकी चार तसेच आलापल्ली येथील तीन असे एकूण सात हत्ती गुजरातला पाठविण्यात येणार आहेत. मनसेने सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी तीव्र विरोध करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
मनसेचं पत्र जसं आहे तसं
प्रति,
मा.ना. आदित्य ठाकरे,
पर्यटन मंत्री महाराष्ट्र
सवनिय जय महाराष्ट्र!
विषय: गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ परराज्यात न नेण्याबाबत
महोदय,
आपणांस या निवेदना द्वारे विनंती करतो की गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे कमलापूर येथील हत्ती कंम्प, मात्र गेल्या काही दिवसांपासून या हत्ती कॅम्प बद्दल उलट सुलट चर्चा सुरू असते. तसेही एवढ्या चांगल्या उत्ती कॅम्प कडे प्रशासनाचे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष आहे. म्हणूनच कॅम्प मधीत हत्ती मृत्युमुखी पडने, त्याची देखभाल बरोबर नसणे, आतातर हा कॅम्प गुजरात राज्यात नेण्याच्या हालचाली सुरू आहे, तेथीत रिलायन्स ग्रुप तर्फे उभारण्यात येत असलेल्या प्राणिसंग्रहालयाला देण्याचा खटाटोप सुरू आहे, गडचिरोली जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नाही त्यातही अख्या राज्यात एकमेव असलेता हत्ती कॅम्प विकसित करण्यापेक्षा तो गुजरातला हलविणे म्हणजे राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखे होय, खर बघितल्यास ४० वर्षापासून असलेता हा हत्ती कॅम्प एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले गेले असते तर अनेक हाताना रोजगार उपलब्ध झाला असता, अजूनही वेळ गेलेली नाही, मंत्री महोदय आपण स्वतः पर्यटन मंत्री आहात तसेच प्राणी प्रेमी पण आहात. आपल्या राज्यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट दुसऱ्या राज्यात जाणे हे शोभादेणारी बाब नक्कीच नाही. जिल्ह्यातील कमलापुर हत्ती कॅम्प कुठल्याही परिस्थितीत गुजरातला न हलविता तो गडचिरोली जिल्ह्यातीत कमलापूर येथेच कायम ठेवून तो विकसित करण्यासाठी आपण पाऊले टाकावी, हा भाग आगामी कालावधीत विकसित झाल्यास मोठ्या प्रमाणावर राज्यातील पर्यटकांची पाऊले कमलापूरच्या दिशेने वाटचाल करतील, जिल्ह्यातील काही बेरोजगारांच्या हाताला काम पण मिळेल, पर्यटकांची हिरमोड होणार नाही. ही बाब गडचिरोली जिल्ह्यासाठी आकर्षणाचा भाग राहील करिता आपणांस विनंती आहे की आपल्या व्यस्त कामातून लक्ष घालून हा हत्ती कॅम्प व त्यातील हत्ती गुजरातला जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी आपणांस नम्र विनंती, धन्यवाद .
आपला नम्र
हेमंत गडकरी
प्रत रवाना
- मा.ना एकनाथ शिंदे, पालकमंत्री, गडचिरोली
- मा.श्री. संजय मिना जिल्हाधिकारी
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोलीच्या अरण्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प मधील हत्ती परराज्यात नेण्यास #मनसे चा विरोध. आपले प्राणिसंग्रहालय विकसित करण्याकडे राज्य सरकार चे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, आता तरी डोळे उघडा. मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी @MnsHemant ह्यांचे पत्र.#कमलापूर_वाचवा pic.twitter.com/3Xsa5IjT0K
— RajTfanclub (@rajbhakt16) January 10, 2022