Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणूक लालसा भोवली, कोलकात्यात प्रत्येक दुसरा माणूस कोरोना पॉझिटिव्ह!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bengal election crowd

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागलेली असतानाही भारतातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला महत्व दिले. लाखोंची गर्दी गोळा करत पाच राज्यांमधील निवडणूक प्रचाराला महत्व दिलं गेलं. आता त्याचे साइड इफेक्ट दिसत आहेत. सर्वात मोठा फटका सर्वात जास्त मतदानाच्या फेऱ्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये जाणवत आहे. बंगालची राजधानी कोलकाता आता कोरोनाची राजधानी झाले आहे. तेथे कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी होत असलेल्या प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहे. त्याच वेळी, बंगाल राज्यात प्रत्येक चारपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे.

नेत्यांचा प्रचार गर्दीचा फंडा, कोरोनाचा फैलाव मोठा!

  • बंगालच्या निवडणुकीला इतर चार राज्यांपेक्षा सर्वात जास्त महत्व होतं.
  • भाजपाने सत्तारुढ तृणमूल काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्यासाठी संपूर्ण बळ लावलं आहे.
  • तृणमुल काँग्रेसनेही भाजपाला रोखून सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
  • या अटीतटीच्या सामन्यात कोरोनाकडे दुर्लक्ष करुन नेत्यांनी गर्दी जमवण्यावरच लक्ष ठेवलं.
  • त्याचा दुष्परिणाम आता दिसत आहे. कोलकात्यात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची आताची संख्या मागील महिन्यापेक्षा पाच पट जास्त आहे.
  • एका महिन्यापूर्वी २० कोरोना तपासणीत केवळ एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. आता दोनापैकी एक!

निवडणुकीचा प्रचार ज्वर आणि कोरोनाचा ताप सारखाच वाढला…

  • बंगालमध्ये १ एप्रिल रोजी २५,७६६ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यामध्ये केवळ १२७४ लोक पॉझिटिव्ह आढळले. हा पॉझिटिव्ह दर ४.९ टक्के होता.
  • नुकतीच ५५,०६० लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १४,२८१ लोक पॉझिटिव्ह आढळले. हा दर २५ टक्के आहे.
  • काही प्रयोगशाळांमध्ये तपासणी करणाऱ्यांमध्ये पॉझिटिव्ह लोकांचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
  • कोरोना रुग्णांची संख्या वाढून ७,२८,०६१ झाली आहे.
  • कोरोनामुळे मृतांची संख्या १०,८८४ वर गेली आहे.

 

कोरोनाकडे निवडणूक आयोगाचीही डोळेझाक

  • पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत.
  • निवडणूक आयोग यावेळी आठ टप्प्यात निवडणुका घेत आहे.
  • शेवटचे तीन टप्पे एकत्र करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने केली होती, पण आयोगाने ती फेटाळली.
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचारसभा रद्द केल्या.
  • त्यानंतर भाजपाने आपले प्रचार कार्यक्रम मर्यादित स्वरुपात करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची जाहीर सभा नुकतीच रद्द केली.
  • आता शेवटच्या टप्प्याच्या सात दिवस आधी, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो आणि वाहनांच्या मोर्चावर त्वरित परिणाम म्हणून बंदी घातली आहे.
  • जास्तीत जास्त ५०० लोकांना निवडणुकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
  • हे घडलं ते कोलकात उच्च न्यायालयाने कोरोना सुरक्षा नियम पाळले जात नसल्यामुळे निवडणूक आयोगाची कान उघडणी केल्यानंतर.

Tags: bengalcoronakolkataकोरोनाकोलकाताबंगला निवडणूकबंगाल
Previous Post

आज ६६ हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे झाले! आजवर कोरोनामुक्त झालेले ३५ लाखांवर!

Next Post

खासगी बड्या रुग्णालयांनाही लाजवणारे सार्वजनिक रुग्णालय

Next Post
one rupee clinic

खासगी बड्या रुग्णालयांनाही लाजवणारे सार्वजनिक रुग्णालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!