Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाणे स्थानक रस्ता परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास”: एकनाथ शिंदे

June 15, 2021
in सरकारी बातम्या
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

ठाणे रेल्वेस्थानक रस्ता परिसरात सुमारे १०० वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच छताखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत असून त्याचे सविस्तर सादरीकरण आज मंत्रालयात झाले. ठाणे महापालिकेकडे या प्रकल्पासाठी एक महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

ठाणे स्टेशन रोड परिसरात तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जुनी ठाणे महानगरपालिका इमारत, जिल्हा परिषदेची कन्याशाळा, अशा काही इमारती उभ्या आहेत. मात्र सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे असल्याने गेली काही वर्षे या इमारतींच्या जागी अत्याधुनिक पद्धतीची सरकारी कार्यालये व्हावीत यासाठी पालकमंत्री शिंदे प्रयत्नशील आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने आता तो वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी बैठकीत सांगितले. तसेच, वेगाने हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले.

या भागातील कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास होणार असून सर्व कार्यालयाना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे. या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खासगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे. तसेच, काही छोटी खासगी कार्यालये आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत.

या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 


Tags: Minister Eknath Shindethaneठाणे महानगरपालिकानगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

“कोरोना संकटातही उत्कृष्ठ काम करणाऱ्या आशा सेविकांवर संपाची वेळ येणं दुर्दैवी!”- देवेंद्र फडणवीस

Next Post

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्यावी” – धनंजय मुंडे

Next Post
Dhananjay munde

"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्यावी" - धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!