राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आज विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १६४ आमदारांचा पाठिंबा मिळवत जिंकल्यामुळे नव्या सरकारचे बहुमत दिसले होते. आज विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावावर झालेल्या मतदानात तेवढीच मते मिळवत या सरकारने बहुमत चाचणीत विजय मिळवला आहे. विधानसभा अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर सरकारच्याबाजूने कमी झाले होते. पण हिंगोलीचे शिवसेना आमदार बांगर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कालचा १६४चा आकडा कायम राहिला.