मुक्तपीठ टीम
संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. वाईट बातम्यांनी वातावरण भरलेले आहे. याच नकारात्मकतेत काही सकारात्मक बातम्याही समोर येत आहेत. लोक कोरोनाला हरवून मोठ्या संख्येनं घरी परतत आहेत. हल्लीच एका आठ दिवसांच्या नवजात चिमुरड्यानं कोरोनावर मात केली आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी हा मोठाच दिलासा आहे.
नेमक काय घडलं होतं?
- ही सकारात्मक बातमी गाझियाबादमधील यशोदा रुग्णालयातील आहे.
- एका महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात आली होती.
- सुरुवातीला तिची कोरोना टेस्ट केली असता तिची चाचणी निगेटिव्ह आली होती.
- पण प्रसूतीनंतर घरी परतल्यावर तिची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
- त्यावेळी नवजात बालकालाही कोरोनाची लागण झाली.
- १५ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.
- आता त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
A newborn baby from Ghaziabad beats COVID-19
“Mother was Covid(-ve) before delivery. After going home she has got infected. The 8-days-old baby also got the virus. Infant has now tested negative for COVID-19, we have discharged newborn after 15 days of treatment,” says Doctor. pic.twitter.com/uo4CRvza2N
— ANI (@ANI) April 30, 2021
संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रसूतीआधी माता कोरोना निगेटिव्ह आली होती. पण घरी परतताच तिला कोरोनाची लागण झाली. तसेच तिच्या ८ दिवसांच्या मुलालाही संसर्ग झाला होता. त्याच्यावर १५ दिवसांच्या उपचारानंतर आता त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे”.