Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगावच्या हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांना वेग

April 27, 2022
in सरकारी बातम्या
0
Efforts to rehabilitate the Hatnur project in Jalgaon

मुक्तपीठ टीम

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत ३४ गावे प्रकल्पबाधीत असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये नव्याने १२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

           

विजय वडेट्टीवार यांच्या मंत्रालयासमोरील सिंहगड निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमणराव पाटील, पुनवर्सन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, जळगावचे अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन, रविंद्र भारदे, कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, नाशिक महसूलचे उपायुक्त गोरस गाडीलकर यावेळी उपस्थित होते.

          

विजय वडेट्टीवार म्हणाले, शासनाने ३४ गावे पुनर्वसीत करण्यासाठी ४० कोटी रूपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या ३४ गावांमध्ये काही नागरी सुविधांची कामे पूर्ण झालेली आहेत. पुनर्वसन गावांतील अपूर्ण कामे तसेच ज्या कामांची दरवाढ  झाली असून या कामांसाठी लागणारा अतिरिक्त निधी, नव्याने जी गावे पुनर्वसनामध्ये समाविष्ट करायची आहेत, त्या १२ गावांचा सुस्पष्ट प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. ही कामे वेगोने पूर्ण करून या पुनर्वसीत गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हतनूर प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावा – मंत्री गुलाबराव पाटील            

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, हतनूर प्रकल्पातील पुनर्वसीत गावांतील नागरी सुविधांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच शासनाकडून या ३४ गावांच्या कामासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद केली होती, मात्र दरवाढीमुळे या कामांसाठी अधिकचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर हतनूर प्रकल्प पुनर्वसनअंतर्गत नव्याने १२ गावांचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.या कामांना तातडीने निधी देवून ही कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता गुलाबराव मंत्री पाटील यांनी केली.


Tags: HatnurHatnur ProjectjalgaonMinister Gulabrao Patilमंत्री गुलाबराव पाटीलहतनूर प्रकल्प
Previous Post

आता राणांचे आर्थिक व्यवहार लक्ष्य!

Next Post

“पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
Bhagat Singh Koshyari Scout Guide State Award Ceremony

"पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा" - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!