Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षण मंत्रालयाचं सर्व्हेक्षण : ६५% शिक्षक कामाच्या ओझ्याखाली! ४८% विद्यार्थी शाळेत पायी जातात!!

May 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
teacher

मुक्तपीठ टीम

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) २०२१ अहवाल प्रकाशित केला. या अहवालात देशातील ४८ टक्के शाळेत जाणारी मुले पायीच शाळेत जातात. केवळ नऊ टक्के मुले शालेय वाहनांचा वापर करतात ही बाब समोर आली आहे. तसेच या अहवालानुसार, ४४ टक्के शिक्षकांना पुरेशी कामाची जागा नाही, तर ६५ टक्के शिक्षकांवर कामाचा ताण आहे.

सर्व्हेक्षणात ३४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश!!

  • सर्व्हेक्षणात ७२० जिल्ह्यांतील १ लाख १८ हजार शाळांमधील ३४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.
  • शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एनएएस २०२१ (NAS-2021) चे आयोजन शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने केले होते.
  • याआधी २०१७ मध्ये एनएएस करण्यात आले होते.

२५ टक्के पालकांचे मुलाच्या शिक्षणात सहकार्य नाही…

  • ८७ टक्के विद्यार्थांचे पालक अभ्यासासाठी मार्गदर्शन करतात, तर २५ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालकांचे सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले.
  • १८ टक्के मुले सायकलने, ९ टक्के सार्वजनिक वाहनाने, ९ टक्के शालेय वाहनाने, ८ टक्के त्यांच्या दुचाकी आणि ३ टक्के चारचाकी वाहनाने शाळेत जातात.
  • अहवालानुसार, ८९ टक्के मुले शाळेत शिकवलेले धडे त्यांच्या कुटुंबियांना सांगतात.

६५ टक्के शिक्षकांवर कामाचा ओझा-

  • शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS)-२०२१ नुसार, ४४ टक्के शिक्षकांना पुरेशी कामाची जागा नाही, तर ६५ टक्के शिक्षक जास्त काम करतात.
  • सर्वेक्षणानुसार, ५८ टक्के शिक्षकांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील चर्चेत भाग घेतला आहे.
  • एनएएस २०२१ मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील १ लाख १८ हजार शाळांमधील पाच लाख शिक्षकांनी सहभाग घेतला.
  • ९७ टक्के शिक्षकांनी त्यांच्या नोकऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.
  • त्यापैकी ९२ टक्के शिक्षकांनी त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी वाव व्यक्त केला.
  • सर्वेक्षणानुसार, डीआयईटी (DIET), सीबीएसई (CBSE) आणि एनसीईआरटी (NCERT) द्वारे आयोजित व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये ५२ टक्के सहभागी झाले आहेत.

Tags: Education MinistryNASstudentsteachersनॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेविद्यार्थीशालेय शिक्षण आणि साक्षरता विभागशिक्षकशिक्षण मंत्रालय
Previous Post

पुरुष वृत्तपत्रापासून तर महिला टीव्हीपासून दुरावत आहेत! वाढतोय डिजिटल मीडियाचा वापर!!

Next Post

दोन हजाराच्या नोटा गेल्या तरी कुठे? छापलेल्यांपैकी २ टक्के नोटाही नाही वापरात!

Next Post
2000 rupee

दोन हजाराच्या नोटा गेल्या तरी कुठे? छापलेल्यांपैकी २ टक्के नोटाही नाही वापरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!