Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दोन हजाराच्या नोटा गेल्या तरी कुठे? छापलेल्यांपैकी २ टक्के नोटाही नाही वापरात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
2000 rupee

मुक्तपीठ टीम

२०१६ च्या नोटाबंदीनंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलणात आल्या. यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांची नोट चलनातून काढण्यात आली. मात्र नोटाबंदीच्या काळात जारी करण्यात आलेली २ हजारची नोट सध्या क्वचित बघायला मिळत आहे. बँकांच्या एटीएम आणि बाजारात २ हजारांच्या नोटांचा वापर कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता २००० च्या नोटा कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून २००० हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

सध्या जवळपास २१४ कोटी नोटांचा वापर सुरू…

  • मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून १.६ टक्के इतकाच राहिला आहे.
  • सध्या जवळपास २१४ कोटी नोटांचा वापर सुरू आहे.
  • या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व मूल्याच्या नोटांची एकूण संख्या १३ हजार ५३ कोटी इतकी होती.
  • त्याआधी एक वर्षाच्या आधी हा आकडा १२ हजार ४३७ कोटी इतका होता.

२०२१ अखेरीस २००० रुपयांच्या नोटांची संख्या घटून २४५ कोटी रुपयांवर…

  • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०२० च्या अखेरीस चलनातील व्यवहारात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या २७४ कोटी इतकी होती.
  • हा आकडा चलनात असलेल्या एकूण नोटांच्या संख्येच्या अनुषंगाने २.४ कोटी इतका होता.
  • त्यानंतर मार्च २०२१ अखेरीस २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या घटून २४५ कोटी रुपये किंवा दोन टक्के इतकाच राहिला.
  • नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात हा आकडा २१४ कोटी रुपये म्हणजे जवळपास १.६ टक्के राहिला.
  • मार्च २०२० मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य हे सर्व मूल्यांच्या नोटांच्या तुलनेत २२.६ टक्के होते.
  • त्यानंतर मार्च २०२१ अखेरीस हा आकडा कमी होऊन १७.३० टक्के आणि मार्च २०२२ मध्ये १३.८ टक्के इतका झाला.

Tags: २ हजार रुपये2000 rupeesIndiaRBIभारतभारतीय रिझर्व्ह बँक
Previous Post

शिक्षण मंत्रालयाचं सर्व्हेक्षण : ६५% शिक्षक कामाच्या ओझ्याखाली! ४८% विद्यार्थी शाळेत पायी जातात!!

Next Post

रेस्टॉरंट करु शकत नाही सक्तीची सर्व्हिस चार्ज वसुली! ग्राहक खात्याकडून गंभीर दखल!!

Next Post
Ministry of Consumer Affairs

रेस्टॉरंट करु शकत नाही सक्तीची सर्व्हिस चार्ज वसुली! ग्राहक खात्याकडून गंभीर दखल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!