Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांचीही होणार चौकशी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nawab Malik

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मलिकांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांचीही चौकशी होणार आहे. ईडीने त्याच्या कुटुंबाच्या नावावर नोंदवलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील मिळण्यासाठी मुंबई उपनगरच्या निबंधकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ईडीने निबंधकांकडे नवाब मलिक, त्यांची पत्नी मेहजबीन आणि मुलगा फराज मलिक यांच्या नावावर नोंदवलेल्या सर्व संपत्तीची कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे. ईडीने २४ मार्च रोजी हे पत्र लिहिले होते. वास्तविक, ईडीने याआधी मलिक कुटुंबीयांकडून ही सर्व कागदपत्रे मागवली होती. मात्र तेथून कागदपत्रे न मिळाल्याने आता ईडीने निबंधक कार्यालयात धाव घेतली आहे.

 

मालमत्तेत मलिक यांचा मुलगा फराजच्या नावावर असलेल्या दोन फ्लॅटचा समावेश आहे. गुलामनबी मंझील, सांताक्रूझ (पश्चिम) येथील फ्लॅट क्रमांक ६ आणि वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे वास्तू भवन येथील फ्लॅट क्रमांक ५०१ आहेत. ईडीने कुर्ला (पश्चिम) येथील नूर मंझिल येथील फ्लॅट क्रमांक बी-०३, सी-२, सी-१२ आणि जी-८ चे रेकॉर्डही मागवले आहेत. हे फ्लॅट मलिक आणि त्यांची पत्नी मेहजबीन यांच्या नावावर आहेत.

 

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

  • भाजपा बदनामी करताना कुठल्याही थराला जात आहे. नवाब मलिकांवर आरोप झाले.
  • सिद्ध झाल्यावर बघू त्यांचे काय करायचे. पण तुम्ही ज्याप्रकारे आरोप करत आहेत, हे पाहता ते नवाब मलिक दाऊदचा हस्तक असल्याचे दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करायची.
  • केंद्राच्या यंत्रणांना थाळ्या वाजवा, दिवे लावा हेच करता येते का? इतकी वर्ष मलिक निवडून येत होते. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांना हे दिसले नाही.
  • ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही का? माहिती तुम्हीच द्यायची, चौकशी तुम्हीच करायची मग ईडी करतेय काय? ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही.
  • सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो.
  • पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.

Tags: EDmumbaiNawab MalikNCPईडीनवाब मलिकफराज मलिकमेहजबीन मलिक
Previous Post

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

Next Post
Maharashtra received 4 National Water Awards

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!