मुक्तपीठ टीम
बँकाचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेले विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना ईडीने मोठी कारवाई केली आहे. तिन्ही उद्योगपतींची ईडीने १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी या तिघांची मिळून ९३७१ कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे.
ईडीने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा सरकारी बँका आणि केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आल्याचंही ईडीनं म्हटलं आहे. ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती.
ED not only attached/ seized assets worth of Rs. 18,170.02 crore (80.45% of total loss to banks) in case of Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi under the PMLA but also transferred a part of attached/ seized assets of Rs. 9371.17 Crore to the PSBs and
Central Government.— ED (@dir_ed) June 23, 2021
- विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी सरकारी बँकांना एकूण २२,५८५ कोटी रुपयांचा चुना लावला.
- सध्या विजय माल्ल्या न्यायालयीन लढाईत पूर्णपणे गुंतला आहे.
- मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी काही बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंजाब नॅशनल बॅंकत १३,५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
- नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरूंगात असून, मेहुल चोक्सी डोमिनिकातील तुरूंगात आहे.
- दोघांविरुद्धही सीबीआय चौकशी करत असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.