मुक्तपीठ टीम
काँग्रेसची राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सध्या ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. या यात्रेची व्यवस्था करण्यात सध्या कर्नाटकाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार व्यस्त असताना ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. शनल हेराल्ड प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. शिवकुमार यांना ७ ऑक्टोबर रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सध्या कर्नाटकात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना हे समन्स आले आहेत. या यात्रेच्या संचालनात शिवकुमार यांचा सहभाग आहे. गेल्या महिन्यात, चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडताना, त्यांनी पत्रकारांना सांगितले की एजन्सीने त्याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. परंतु, त्यांच्याविरुद्ध हे नवीन प्रकरण (अप्रमाणित मालमत्ता) काय आहे हे त्यांना माहीत नाही.
शिवकुमार म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या भावाने यंग इंडियनला केलेल्या पेमेंटबद्दल प्रश्न विचारले हे आश्चर्यकारक आहे. यंग इंडियन हीच कंपनी नॅशनल हेराल्डच्या मालकीची आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने गेल्या काही महिन्यांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बन्सल यांची चौकशी केली आहे.