Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरी पोटनिवडणूक: पहिल्या चाचणीत शिवसेनेच्या ऋतुजा लटके बाजी मारणार की गेल्यावेळचे बंडखोर मुरजी पटेल शिंदे गटाच्या मदतीनं विजयी होणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
rutuja Latke And Murji Patel

मुक्तपीठ टीम

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक एकप्रकारे जनमत चाचणी मानली जात आहे.

असा असणार निवडणूक कार्यक्रम-

  • केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
  • येत्या ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
  • तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
  • १४ ऑक्टोबरही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
  • १५ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार आहे.
  • तर १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

शिवसेना आणि भाजपा-शिंदे गटात चुरशीची लढत

  • अंधेरी पोटनिवडणूक ही शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिली मोठी निवडणूक आहे.
  • या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपा-शिंदेगट युती यांच्या बळाची परीक्षा आहे.
  • खरंतर शिवसेनेने २०१९मध्ये ही जागा जिंकल्याने तिथे शिंदे गटाचा उमेदवार अपेक्षित होता. पण भाजपाने या जागेवर उमेदवार दिला आहे.
  • त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार ऋजुता रमेश लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होईल.
  • रमेश लटके यांच्या पत्नी ऋजुता रमेश लटके यांना मतदारांमधील सहानुभुतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
  • तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंधेरीत बंडानंतर न झालेली फाटाफूट त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
  • त्यांच्यासाठी अर्थबळ कोण उभे करेल, ही त्यांच्या लढण्यातील महत्वाची समस्या ठरणार आहे. तसेच चिन्हाचा वादही नेमकं कोणतं वळण घेतो, तेही महत्वाचं असेल.
  • दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरी आणि मुरजी पटेलांचं अर्थबळ आणि त्यातून जनसंपर्क ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.
  • मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीचे जातीच्या दाखल्याचे प्रकरण, ते मुळचे भाजपा संस्कृतीतील नसणं या बाबी भाजपासाठी समस्या ठरू शकतात.

अर्थात राजकारणात अशक्य काही नसतं. त्यामुळे नेमकं ३ नोव्हेंबरला अंधेरीकर मतदार काय करतील, कोणतं बटन दाबतील ते आताच सांगता येणार नाही. पण गेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये सहानुभुतीची मते विजयाचे शिल्पकार ठरली होती. त्यामुळे आता सहानुभुतीची मते शिवसेनेच्या विजयाचा भगवा फडकवतात की भाजपा शिंदे गटाच्या मदतीनं आपलं कमळ फुलवते, हे ६ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.


Tags: Andheri By ElectionsMurji PatelRutuja LatkeShivsenaअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघअंधेरी पोटनिवडणूकऋतुजा लटकेमुरजी पटेलशिवसेना
Previous Post

हवाईदलाचं बळ वाढवणारे स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर्स! जाणून घ्या कसे, कुठे उपयोगी…

Next Post

कर्नाटकात काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरात, ईडीची प्रदेशाध्यक्षांना चौकशीची नोटीस!

Next Post
State President Shivakumar

कर्नाटकात काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरात, ईडीची प्रदेशाध्यक्षांना चौकशीची नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!