मुक्तपीठ टीम
गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडी आता चांगलीच सक्रीय झाली आहे. मुंबईत ईडीने तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. तर नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसवर छापे टाकण्यात आले आहेत.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील आणखी दोन ठिकाणी छापेमारी!!!
- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
- राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.
- अशातच संजय राऊत यांची आज ईडी कोठडीत चौकशी होणार आहे.
- संजय राऊत यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होणार आहे.
- राऊत यांचे वकील सकाळी ८.३० ते ९.३० वाजता कोठडीत भेट घेतली.
- अशातच संजय राऊतांची ईडी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीनं पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील आणखी दोन ठिकाणी छापेमारी केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून छापेमारी
- अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे.
- ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे.
- या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
- मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.