मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश अनिल परब यांना दिल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे. दरम्यान ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांविरोधात आघाडी उघडली होती. त्यांच्या कोकणातील रिसॉर्टविरोधातही कारवाईसाठी ते सातत्यानं मागणी करत आहेत.
भारत आणि महाराष्ट्र सरकार MCZMA ने अनिल परबचे दापोली रिसॉर्ट सीआरझेड/बेकायदेशीर आहे असे सांगीतले
शासनाने लोकायुक्ताला कळवले की साई रिसॉर्ट पाडण्याची नोटीस दिली आहे.
परबने 17,800 चौरस फूट रिसॉर्टसाठी 29/11/2019 आणि 17/12/2020 मालमत्ता कर भरला आहे
अनिल परबचे रिसॉर्ट कधी पाडणार? pic.twitter.com/YraJJiqEjN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 27, 2021
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021
महाड येथील जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे त्यांना अटकही करण्यात आली, दरम्यान यावेळी राणेंना अटक करण्यासाठीअनिल परब यांचा हात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजापाने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलील असताना, आता ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे.