Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

थेट ठाकरेंच्या घराजवळ ईडी पिडा! भाजपाXशिवसेना सामन्यातील अंतिम फेरीचा आरंभ?

पुढे काय घडणार? काय बिघडणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरळस्पष्ट
0
Ed Uddhav Thackeray 22-3-22

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या Shridhar Patankar, Uddhav Thackeray’s Sala (brother in law) Money Laundering Scam… Use of Shell Companies, ED attached his Properties. Ghotalebajo ko Chhodenge Nahi या संध्याकाळी पावणे सहाच्या ट्वीटनंतर जगभर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. भाजपाच्या सत्तेत आजवर अनेक भाजपा विरोधकांपर्यंत पोहचलेली ईडीची पिडा आता ठाकरेंच्या घराजवळ ईडीपिडा पोहचली. या कारवाईनंतर भाजपा विरुद्ध शिवसेना हा गेले दोन वर्षे सुरु असलेल्या जंगी सामन्याचा आता फायनल राऊंड सुरु झाला आहे, असे मानले जाते. अर्थात सध्यातरी दोन्ही बाजूंकडून सांगितलं जातं तसं हा सामना आरपारचा होणार की राजकारणात काहीच अशक्य नसतं या तत्वानुसार टाय हे स्पष्ट नाही.

 

Shridhar Patankar, Uddhav Thackeray's Sala (brother in law) Money Laundering Scam… Use of Shell Companies, ED attached his Properties

Ghotalebajo ko Chhodenge Nahi@BJP4India @BJP4Maharashtra

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 22, 2022

ईडीची पिडा ठाकरेंच्या घराजवळ कशी पोहचली?

  • श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत.
  • त्यांच्या मालकीचे ठाणे शहरातील ११ फ्लॅट्स आज ईडीनं जप्त केले.
  • श्रीधर पाटणकरांच्या मालकीची श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे.
  • ईडीनं जप्त केलेले ११ फ्लॅट्स या कंपनीच्या मालकीचे आहेत, असा ईडीचा दावा आहे.
  • ईडी गेले काही दिवस करत असलेली कारवाई कोलकाता स्थित शेल कंपन्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे असल्याचे कळते.
  • अशा शेल कंपन्यांपैकीच एक कंपनी म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी यांची हमसफर डिलर ही आहे, असा ईडीचा दावा आहे.
  • नंदकिशोर चतुर्वेंदींच्या या कंपन्यांशी महेश पटेलही संबंधित आहेत.
  • नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहेत.
  • त्यांच्या कंपन्यांवरही २०१७मध्ये कारवाई झाली होती. तेव्हा अनेक कंपन्यांशी झालेले व्यवहार उघड झाले होते.
  • हमसफर डिलर ही शेल म्हणजे फक्त संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी असल्यााच ईडीचा आरोप आहे.
  • नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे मनी लॉन्ड्रिंगने पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले, असा ईडीचा दावा आहे.
  • मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून तीस कोटी रुपये आले.
  • त्या पैशांमधूनच ठाणे शहरात निलांबरी प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम केल्याचा आरोप आहे.
  • अशा प्रकारे ईडीची पिडा आता पाच वर्षांनंतर ठाकरेंच्या घरापर्यंत पोहचली आहे.

 

आता काय घडणार?

  • ईडीच्या या कारवाईला भाजपा विरुद्ध मविआ त्यातही शिवसेना सामन्यातील फायनल राऊंडची सुरुवात मानायची की आणखी काही राऊंड बाकी आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
  • मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदारांशी बोलताना भाजपावर आक्रमक चढाई केली होती.
  • आक्रस्ताळी हिंदुत्वावादी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना नवहिंदू संबोधत थेट सरसंघचालकांच्या भूमिकेचे दाखले देते त्यांना मोहन भागवतऐवजी मोहन खान संबोधणार का असा सवाल केला होता.
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात थेट भाजपाला आव्हान देत आरपारच्या लढाईची घोषणा केली होती.
  • आता आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर राजकीय सूडबुद्धीतून कारवाईचा आरोप केला आहे.
  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमधील घोटाळेबाजांना सोडणार नाही, या इशाऱ्यातून पुढील भूमिकाही स्पष्ट दिसत आहे.
  • त्यामुळे आता पुढे काय घडणार? दोन्ही पक्ष तडजोडीच्या भूमिकेत येणार? राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांविरोधात एअर इंडिया प्रकरणी खूप वातावरण निर्मिती झाली, पण पुढे काही झाले नाही, तशी तडजोड होणार की ईडीची पिडा आणखी वाढत अंतिम निकालापर्यंत राजकीय सामना भडकणार हाच आता महत्वाचा प्रश्न आहे.

 

 


Tags: EDshridhar patankarUddhav Thackerayईडीउद्धव ठाकरेश्रीधर पाटणकर
Previous Post

राज्यात १५६ नवे रुग्ण, २६९ रुग्ण बरे! मुंबई २६, नाशिक ४, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Next Post

वाढदिवसाला साहित्य वारी, चिमुकल्या मुलीची शाळेत पुस्तकांची पार्टी

Next Post
book distribution

वाढदिवसाला साहित्य वारी, चिमुकल्या मुलीची शाळेत पुस्तकांची पार्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!