मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या Shridhar Patankar, Uddhav Thackeray’s Sala (brother in law) Money Laundering Scam… Use of Shell Companies, ED attached his Properties. Ghotalebajo ko Chhodenge Nahi या संध्याकाळी पावणे सहाच्या ट्वीटनंतर जगभर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. भाजपाच्या सत्तेत आजवर अनेक भाजपा विरोधकांपर्यंत पोहचलेली ईडीची पिडा आता ठाकरेंच्या घराजवळ ईडीपिडा पोहचली. या कारवाईनंतर भाजपा विरुद्ध शिवसेना हा गेले दोन वर्षे सुरु असलेल्या जंगी सामन्याचा आता फायनल राऊंड सुरु झाला आहे, असे मानले जाते. अर्थात सध्यातरी दोन्ही बाजूंकडून सांगितलं जातं तसं हा सामना आरपारचा होणार की राजकारणात काहीच अशक्य नसतं या तत्वानुसार टाय हे स्पष्ट नाही.
Shridhar Patankar, Uddhav Thackeray's Sala (brother in law) Money Laundering Scam… Use of Shell Companies, ED attached his Properties
Ghotalebajo ko Chhodenge Nahi@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 22, 2022
ईडीची पिडा ठाकरेंच्या घराजवळ कशी पोहचली?
- श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत.
- त्यांच्या मालकीचे ठाणे शहरातील ११ फ्लॅट्स आज ईडीनं जप्त केले.
- श्रीधर पाटणकरांच्या मालकीची श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे.
- ईडीनं जप्त केलेले ११ फ्लॅट्स या कंपनीच्या मालकीचे आहेत, असा ईडीचा दावा आहे.
- ईडी गेले काही दिवस करत असलेली कारवाई कोलकाता स्थित शेल कंपन्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे असल्याचे कळते.
- अशा शेल कंपन्यांपैकीच एक कंपनी म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी यांची हमसफर डिलर ही आहे, असा ईडीचा दावा आहे.
- नंदकिशोर चतुर्वेंदींच्या या कंपन्यांशी महेश पटेलही संबंधित आहेत.
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहेत.
- त्यांच्या कंपन्यांवरही २०१७मध्ये कारवाई झाली होती. तेव्हा अनेक कंपन्यांशी झालेले व्यवहार उघड झाले होते.
- हमसफर डिलर ही शेल म्हणजे फक्त संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी असल्यााच ईडीचा आरोप आहे.
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे मनी लॉन्ड्रिंगने पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले, असा ईडीचा दावा आहे.
- मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून तीस कोटी रुपये आले.
- त्या पैशांमधूनच ठाणे शहरात निलांबरी प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम केल्याचा आरोप आहे.
- अशा प्रकारे ईडीची पिडा आता पाच वर्षांनंतर ठाकरेंच्या घरापर्यंत पोहचली आहे.
आता काय घडणार?
- ईडीच्या या कारवाईला भाजपा विरुद्ध मविआ त्यातही शिवसेना सामन्यातील फायनल राऊंडची सुरुवात मानायची की आणखी काही राऊंड बाकी आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदारांशी बोलताना भाजपावर आक्रमक चढाई केली होती.
- आक्रस्ताळी हिंदुत्वावादी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना नवहिंदू संबोधत थेट सरसंघचालकांच्या भूमिकेचे दाखले देते त्यांना मोहन भागवतऐवजी मोहन खान संबोधणार का असा सवाल केला होता.
- शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात थेट भाजपाला आव्हान देत आरपारच्या लढाईची घोषणा केली होती.
- आता आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर राजकीय सूडबुद्धीतून कारवाईचा आरोप केला आहे.
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमधील घोटाळेबाजांना सोडणार नाही, या इशाऱ्यातून पुढील भूमिकाही स्पष्ट दिसत आहे.
- त्यामुळे आता पुढे काय घडणार? दोन्ही पक्ष तडजोडीच्या भूमिकेत येणार? राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांविरोधात एअर इंडिया प्रकरणी खूप वातावरण निर्मिती झाली, पण पुढे काही झाले नाही, तशी तडजोड होणार की ईडीची पिडा आणखी वाढत अंतिम निकालापर्यंत राजकीय सामना भडकणार हाच आता महत्वाचा प्रश्न आहे.