Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
67 वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा 2 (1)

मुक्तपीठ टीम

मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.           

बॅालिवूड चित्रपट सृष्टीतील नामांकित ६७ वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अमृता फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, रसिकप्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.            

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व मनोरंजनाची राजधानी म्हणून ओळखली जाते, याचा अभिमान आहे. जगभरात हिन्दी चित्रपटसृष्टीचा नावलौकीक आहे. मात्र, आता मराठी, तेलगु, तमिळ अशा देशांतल्या विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीदेखील मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करीत आहेत. मनोरंजन क्षेत्र बदलत्या नव्या युगातून पुढे जात आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारे देखील हे क्षेत्र आहे. ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असून नवीन सरकार सर्वसामान्यांबरोबर चित्रपटसृष्टीचे देखील आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दादासाहेब फाळके यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विषद करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर प्राप्ती होते. या क्षेत्राला  चांगल्या सुविधा देण्यासाठी आगामी काळात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. मुंबईत असलेली चित्रनगरी येत्या काळात अधिक प्रगती करेल. देशात जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यापासून चित्रनगरीच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मोठ्या प्रमाणात जीएसटी प्राप्त झाला. आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रनगरीच्या व्यवसायात मोठी वाढ होईल. चित्रपट निर्मितीसाठी अनेकवेळा परदेशात जावे लागते, अशा चित्रपटांची निर्मिती देशात आणि महाराष्ट्रात होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बॅालिवूड चित्रपट जगतात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई यांना ‘फिल्मफेअर’चा जीवनगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


Tags: DCM Devendra fadnavisEase Of Doing BusinessMaharashtraइज ऑफ डुईंग बिजनेसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमनोरंजन क्षेत्रमहाराष्ट्र
Previous Post

बी. डी. डी. चाळीत पोलिसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याचा आदेश जारी

Next Post

राज्यात १६०० नवे रुग्ण, १८६४ बरे! मुंबई ६३८, नाशिक ६, नागपूर ११ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात १६०० नवे रुग्ण, १८६४ बरे! मुंबई ६३८, नाशिक ६, नागपूर ११ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!