मुक्तपीठ टीम
भारतातील पहिली स्मार्ट मोबिलीटी सोल्यूशन कंपनी असलेली बाऊन्सने कारचालकांसाठीचे सुपर अॅप पार्क+ यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता ही जोडी भारतातील १० शहरांमध्ये ३,५०० हून अधिक बॅटरी स्वॅपिंग स्थानके उभारणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक ऊर्जा सुविधेचा प्रश्न सुटणार आहे. ग्राहकांना त्यांच्या बाऊन्स अॅप किंवा पार्क+ अॅपवर सर्वात जवळचे बॅटरी स्वॅपिंग स्थानक शोधता येईल. ही अत्याधुनिक, स्मार्ट सुविधा निवासी सोसायट्या, प्रमुख पार्किंग जागा, मॉल्स, कॉर्पोरेट कार्यालये इत्यादी ठिकाणी उपलब्ध असेल.
बाऊन्सची आपली पहिली ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिक स्कूटर, बाऊन्स इन्फिनिटी, २ डिसेंबर रोजी लाँच झाली आहे. ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ या पर्यायासह अशा प्रकारे भारतीय बाजारपेठेत प्रथमच सादर झाली आहे. इंधन भरणा केंद्रांच्या तत्वावरच स्वॅपिंग स्थानकांचे काम चालत आहे. त्याचप्रमाणे, बाऊन्स बॅटरी स्वॅपिंग स्थानकांत ग्राहक सहजी त्यांच्या जवळपास संपत आलेल्या रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात चार्ज केलेली वापरायला तयार बॅटरी एका मिनिटाच्या आत घेऊन पुढे जाऊ शकतील. ठिकठिकाणी असलेल्या या पायाभूत सुविधेमुळे ग्राहकांचा आपली स्कूटर चार्ज करत बसण्यासाठी वेळ जाणार नाही. जोडीला त्यांना बॅटरी चार्ज करायची राहिली आहे, किती पुरेल याची चिंता करत बसावी लागणार नाही.
बाऊन्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकानंद हलाकेरे या भागीदारीबद्दल बोलताना म्हणाले, “जिथे कुठे तुम्ही आहात त्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या आत आमचे बॅटरी स्वॅपिंग स्थानक असावे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही पार्क+शी भागीदारी केली आहे. ही भागीदारी म्हणजे आगामी २४ महिन्यांमध्ये लाखोहून अधिक स्कूटर्स साठी बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधा उभारण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग आहे.”
या भागीदारीविषयी पुढे बोलताना पार्क+चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमित लखोटिया म्हणाले, “तंत्रज्ञानावर आधारित सुविधांची परिसंस्था उभारून स्वयंचलित वाहनचालकांचा अनुभव वृद्धिंगत करणे हे पार्क+चे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहने हे स्वयंचलन वाहनांचे उद्याचे भविष्य आहे. चार्जिंग करण्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव हा इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारातला सर्वात प्रमुख अडथळा आहे. कॉर्पोरेट पार्क्स, शॉपिंग मॉल आणि निवासी संकुले याठिकाणी आमच्या सुविधा जाळ्याच्या माध्यमातून चार्जिंगच्या पायाभूत सुविधा वेगाने उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
बाऊन्स विषयी
छोटे व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी इत्यादी सर्वांच्याच घरापासून कामाच्या ठिकाणी करायच्या प्रवासात सुलभता आणण्याची गरज पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा आणि निग्रह यांतून २०१८ मध्ये बाऊन्सची स्थापना झाली. प्रगतीशील डिजिटल सुविधा आणि जोडीला जमिनीवरील प्रत्यक्षातील सीमलेस कार्ययंत्रणा यांच्या मिश्रणाने बाऊन्स भारतातील सर्वात मोठी स्मार्ट मोबिलीटी सुविधा पुरविणारी कंपनी बनली. बाऊन्स स्वॅपिंग स्थानकांचे वितरण जाळे २०० स्थानकांच्या आसपास असून त्यांनी ५००,००० स्वॅप पूर्ण केले आहेत आणि २ कोटीहून अधिक इलेक्ट्रिक वाहन किलोमीटर प्रवास शक्य केला आहे. आगामी १२ महिन्यात इ-स्कूटर्सचे उत्पादन आणि बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी बाऊन्स सज्ज आहे.
एस्सेल इंडिया, एस्सेल यूएस, सेक्वॉया कॅपिटल इंडिया, बी कॅपिटल, फाल्कन एज, क्वॉलकॉम, चिराटे, ओमिडयार नेटवर्क, माव्हेरिक कॅपिटल इत्यादी मोठ्या गुंतवणूकदारांचे बाऊन्सला पाठबळ असून २२० दशलक्ष अमेरिकन डॉलर हून अधिक निधी त्यांनी उभारला आहे.
पार्क+ विषयी
कारचालकांना रोजच्या दिवसाला भेडसावणाऱ्या समस्यांची पूर्तता करून त्यांना कारमालकीमधला आनंद मिळवून देण्यासाठीचे पार्क+ हे भारताचे सुपर अॅप आहे. पार्किंग, फास्टॅग आणि मॉल्स, कॉर्पोरेट पार्क्स आणि अपार्टमेंट मधले अॅक्सेस नियंत्रण यांसाठी कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उभारली आहे. पार्क+ भारतभरात ९०,००० ठिकाणी ग्राहकांना पार्किंगसाठी शोध, आरक्षण आणि पैसे भरण्याची सुविधा देते. सेक्वॉया कॅपिटल इंडिया, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया आणि एपिक कॅपिटल यांच्या सहकार्याने सिरीज बी निधी फेरीत या प्लॅटफॉर्मने अलिकडेच २५ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी उभारला.