मुक्तपीठ टीम
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काहींनी त्याला डोक्यावर उचलून घेतला तर काही त्यावर दणकून टीका करत आहेत. मात्र, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगलं यश मिळवत आहे. वादामुळे तो पाहण्याकडे प्रेक्षकांचा आणि भाजपा नेत्यांच्या पुढाकारानं आयोजित शोमुळे गर्दी वाढतानाच दिसत आहे. एकीकडे १०० कोटींचा गल्ला जमवणारं यश तर दुसरीकडे चित्रपट चर्चेत असण्याचा गैरफायदा घेण्यासाठी काही ई-भामटे सरसावल्याचं दिसत आहे. ते फुकटात चित्रपट डाऊनलोड करण्याचं आमिष दाखवणारी लिंक पाठवत आहे. ती लिंक क्लिक केली तर त्या अकाऊंटमधील पैशावर डल्ला मारला जात असल्यानं पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत असणारा काश्मिर फाइल्स चित्रपटाच्या नावाचा गैरवापर करून स्मार्टफोन यूजर्सची फसवणूक करण्याचा मार्गही सायबर गुन्हेगारांनी शोधला आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अशा लिंक्सबाबत पोलिसांनी धोक्याची सूचना दिली आहे, जे काश्मीर फाइल्स चित्रपटाचा मोफत एक्सेस देण्याचा दावा करत आहेत.
कसा चालतो मोफत चित्रपट डाउनलोड घोटाळा?
- ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगलीच प्रसिद्धीही मिळाली आहे.
- याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार मोफत चित्रपट डाउनलोड करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवत आहेत. आजवर जेही लोकप्रिय होतं, त्याचा गैरफायदा ई-भामटे असाच घेत असतात.
- या लिंकवर क्लिक करताच, गुन्हेगारांना फोनवरील वैयक्तिक तपशीलात प्रवेश मिळतो आणि ते बँक खात्यांसारखी गुप्त माहिती सहजपणे चोरू शकतात.
काश्मीर फाइल्स व्हॉट्सअॅप फसवणूक कशी होते?
- सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप यूजर्सच्या खात्यावर लिंक पाठवतात. या लिंकसह एक मेसेज असतो जो यूजर्स लिंकवर क्लिक करून ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट मोफत डाउनलोड करू शकतात.
- या लिंकवर क्लिक करताच फोनमध्ये मालवेअर घुसतो.
- हा मालवेअर फोन हॅक करून बँकिंग तपशील चोरतो, जेणेकरून गुन्हेगार आर्थिक व्यवहार करू शकतात.
- पोलिसांनी धोक्याचा इशारा दिला आहे आणि अज्ञात स्त्रोताकडून व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सापडलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका, असे आवाहन केले आहे.
- पोलिसांनी म्हटले आहे की, हे देखील शक्य आहे की यूजर्सचे फोन हॅक केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना त्याबद्दल माहिती देखील नाही आणि खात्यातून पैसे गायब झाल्यावरच हॅकची माहिती मिळेल.
- नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, २४ तासांत तीन जण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि एकूण ३० लाख रुपयांच्या सायबर फ्रॉडची तक्रार दाखल केली.