रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
भारताच्या सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांचे निधन म्हणजे नक्कीच देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. १९४२पासून प्रत्येक पिढीला आपल्या आवाजानं जिंकून घेणाऱ्या लतादीदींच्या एका गाण्याचा उल्लेख हा प्रत्येक भारतीय अभिमानाने करतो. ते गाणं म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगों”. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या गाण्याचा लतादीदींच्या निधनानंतर खास उल्लेख केला. पण तेच नाही, लतादीदींनी हे गाणं लाइव्ह सादर केलं तेव्हाही तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तेच नाही तर तेव्हापासून प्रत्येक पिढीतील भारतीयांना हेलावणारं आणि सैनिक आणि देशप्रेम जागवणारं असं हे गाणं आहे.
“ए मेरे वतन के लोगों, तू खूब लगा लो नारा।” हे गाणे खरे तर भारत-चीन युद्धात दुखावलेल्या भारताला समर्पित होते, ज्याने संपूर्ण देश हादरला होता. ज्या वेळी लता मंगेशकरांनी हे गाणे गायले होते, त्यावेळचे वातावरण अतिशय उदास होते. २६ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी हे गाणे गायले होते. त्यावेळी भारत-चीन युद्ध संपून फारच कमी अवधी झाला होता. हे गाणे प्रसिद्ध गीतकार प्रदीप यांनी लिहिले असून सी रामचंद्रन यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यानंतर कवी प्रदीप म्हणाले की, या गाण्याला लतादीदीच न्याय देऊ शकतात.
लतादीदींचे हे गाणे गाऊन झाल्यावर पंडित नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. हे गाणे ऐकून ते स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी लतादीदींना पुन्हा एकदा हे गाणे गाण्यास सांगितले. त्यांच्या विनंतीवरून लतादीदींनी हे गाणे पुन्हा गायले.
अर्थात लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांमध्ये डोळ्यात पाणी आणणारे हे एकमेव गाणे नव्हते तर अनेक गाणी अशी होती. लतादीदी जेव्हा गाणे रेकॉर्ड करायच्या तेव्हा त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजत त्यात जीव ओतत. त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये काही उणिवा सापडत नाहीत.
नक्की वाचा कवी प्रदीप यांचं ते गाणं..
हेही वाचा:
“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…