मुक्तपीठ टीम
सार्वजनिक खरेदीमधील शेवटच्या टोकापर्यंतचे सरकारी खरेदीदार, विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना एका ठिकाणी आणण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी, टपाल विभागाने सरकारी ई-मार्केटप्लेस [जीईएम] आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड [सीएससी-एसपीव्ही ] सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.या सामंजस्य करारावर जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. के सिंह, सीएससी-एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश आणि पार्सल संचालनालयाचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार रॉय यांनी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी केली.
०५ मे २०२२ रोजी जीईएम आणि भारतीय टपाल विभागाच्या यशस्वी एकत्रीकरणानंतर या सामंजस्य कराराची संकल्पना मांडण्यात आली. या एकत्रीकरणामुळे, आता सर्व सरकारी खरेदीदार, विक्रेते आणि सेवा-प्रदात्यांना भारतातील दुर्गम भागात असलेल्या भारतीय टपाल कार्यालयातून जीईएम वरील लॉजिस्टिक सेवा आणि सुविधांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.याव्यतिरिक्त, टपाल विभागाची 1.3 लाखाहून अधिक सीएससी विक्री व्यवस्था केंद्रे जीईएमवर विक्रेत्यांना उत्पादन विक्रीसाठीची सुविधा उपलब्ध करून देतील.
टपाल विभाग आणि जीईएम यांच्यातील या करारामुळे विक्रेत्यांना त्यांच्या जीईएम पोर्टलवरील प्रोफाइल पेजवरून वस्तूंची उचल , नोंदणी, परिवाहन आणि वितरणासाठी टपाल विभागाच्या सेवांची निवड करता येईल.
“जीईएम आणि सीएससी-एसपीव्हीसोबतची नवीन भागीदारी, जीईएम पोर्टलवरील विक्रेत्यांसाठी अधिक पसंतीचा लॉजिस्टिक सेवा प्रदाता म्हणून टपाल विभागाला पुढे आणेल.यामुळे 1.5 लाख+ भारतीय टपाल कार्यालयांच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत थेट कनेक्टिव्हिटीद्वारे उच्च-दर्जाची सेवा आणि ई-कॉमर्स लाभांचे जलद वितरण सुनिश्चितहोईल, असे टपाल सेवा विभागाचे महासंचालक अलोक शर्मा यांनी सांगितले.