मुक्तपीठ टीम
हिंदुजा समुहाचा एक भाग असणाऱ्या गल्फ ऑईल इंटरनॅशनल लिमिटेड (गल्फ) ने हायब्रीड आणि इलेक्ट्रिक प्रवासी कार्ससाठी इ-फ्लुईड्सची मालिका सादर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ही उत्पादने युरोप, मध्य-पूर्व आणि चीन यांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सादर करण्यात आली होती आणि आता गल्फ ऑईल ल्युब्रीकंट्स इंडिया लिमिटेड त्यांना भारतीय बाजारपेठेत सादर करत आहे. इ-फ्लुईड्स सादर करत भविष्यातील दळणवळणाच्या दिशेने गल्फ ऑईलचे पुढचे पाऊल टाकल्याचे मानले जाते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास बनवलेल्या या इ-फ्लुईड्समुळे बॅटरी लाईफ वाढविण्यासाठी मदत, इंधन अर्थकारण सुधारणा आणि कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जनात घट होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
वाहनाची कामगिरी आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी इ-फ्लुईड्सची विशेष रचना करण्यात आली आहे. ब्रेक यंत्रणा सुधारावी आणि गंज चढण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी गल्फ इलेक ब्रेक फ्लुईड्सची रचना करण्यात आली आहे. त्याचवेळी इलेक कुलंट अत्यंत तीव्र परिस्थितीतही इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीजना थंड ठेवेल. गल्फ इलेक ड्राईव्हलाईन फ्लुईडची रचना व्यापक सुविधांच्या मालिकेसाठी खास तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या रेअर अॅक्सेल्स आणि ट्रान्स अॅक्सेल्समध्ये वेट/ड्राय आणि मल्टी स्पीड ट्रान्समिशन यांचा समावेश आहे. त्याच्या विशेष सुत्रामुळे ताज्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या ऑईल मध्ये सर्वोत्तम इलेक्ट्रिकल गुणधर्म मिळतील आणि जिथे अॅक्सेल फ्लुईड हे इलेक्ट्रिकल घटकांच्या थेट संपर्कात येईल तिथे या सुविधांसाठी ते सर्वाधिक योग्य आहे.
गल्फ फॉर्म्युला हायब्रीड सुधारित इंजिन सिंथेटिक ऑईल आणि हायब्रीड कार्स करता ट्रान्समीशन फ्लुईड विविध प्रकारच्या तापमानात इंजिनाची कामगिरी अबाधित ठेवायला मदत करेल. नवीन पिढीतील ग्राहकांना प्रभावी आणि सुयोग्य सुविधा पुरविण्यासाठी आणि भविष्यातील दळणवळणाचे माध्यम अधिक सक्षम करण्यासाठी गल्फ ऑईल हे नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्ण राहिले आहे.
या सादरीकरणाच्या वेळी बोलताना गल्फ ऑईल ल्युब्रीकंट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवी चावला म्हणाले, “सतत बदलत असलेले प्रवाह, तांत्रिक अडचणी आणि धोरणातील सुधारणा यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये स्वयंचलन उद्योगांच्या मागणीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनुषंगिक विकास घडतच आहे आणि तो वेगाने होताना दिसत आहे. ग्राहकांच्या वाढत्या आणि बदलत्या मागण्या पूर्ण करताना जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी गल्फ ऑईल नेहमीच सर्वोत्तम तंत्रज्ञानात आणि सतत होणाऱ्या नाविन्यपूर्णतेत आघाडीवर राहिले आहे. गल्फमध्ये आम्ही दळणवळण क्षेत्रातील शाश्वत भविष्याच्या बांधणीसाठी मदत करण्याकरता सुलभ सुविधांच्या बांधणीवर भर दिला आहे. आमच्या विविध उत्पादनांच्या साथीत आम्ही लवकरच वेगवेगळ्या विभागांत ओइएम बरोबर कार्यरत राहणार आहोत.”
गल्फ ऑईल इंटरनॅशनलचे संशोधन आणि तंत्रज्ञान उपाध्यक्ष डेव्हिड हॉल या सादरीकरणाच्या वेळी बोलताना म्हणाले, “बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांना ल्युब्रीकंट प्रकारचे फ्ल्यूईड लागते. खरेतर त्यांना खूप विशिष्ट प्रकारच्या फ्ल्यूईडची गरज असते आणि तेच आम्ही गल्फमध्ये विकसीत केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे ट्रान्समीशन (प्रेषण) उच्च वेगाला आणि तापमानाला कार्यान्वित होते तर पारंपरिक वाहनांमध्ये ते ट्रान्समीशनला होते. या ट्रान्समीशन्स मध्ये अंतर्भूत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक घटक असतात जसे की इ-मोटर्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक. ते थंड होण्याची आणि सुरक्षीत राहण्याची गरज असते. त्यामध्ये असणाऱ्या सिलिंग आणि कोटिंग साहित्याची देखभाल करावी लागते. ब्रेकडाऊन टाळण्यासाठी फ्ल्यूईड कुलिंग आणि उच्च इलेक्ट्रिक प्रतिरोध दर्शवितात. इ- फ्ल्यूईड ही रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांचा उत्तम मेळ साधणारी कृती आहे. गल्फ मधील आम्हा सगळ्यांना भारतात हे उत्पादन तंत्रज्ञान सादर करताना खूप अभिमानास्पद वाटत आहे. ओइएम आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही मोठी बाजारपेठ आहे.”