Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच रुपयात शंभर किलोमीटर…मराठी तरुणांची भन्नाट ई-सायकल!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
e bicycle

मुक्तपीठ टीम

देशभरामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस अशा सर्वच इंधनांच्या किंमती दिवसेंदिवस भडकत आहेत. सामान्य व्यक्तीला प्रवास करणे महाग होत चालले आहे. तसेच रोजच प्रवास आवश्यक असणाऱ्या नोकरदारांनाही वाढता प्रवास खर्च जाचक ठरतोय. यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या मराठी तरुणांनी भन्नाट मार्ग काढला आहे तो ई-सायकलीचा. ही ई-सायकल वेगानं, आरामात आणि फक्त पाच रुपयात शंभर किलोमीटर घेऊन जाईल, असा त्यांचा दावा आहे.

 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावामधील अतुल आणि अमोल पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक सायकल तयार केली आहे. या सायकलीला लाईट, हॉर्न आणि चोरीला जाणार नाही असा सायरन अलार्म बसवलेला आहे. या सायकलीसाठी कोणत्याही लायसेन्स, पासिंग, विमा, रजिस्ट्रेशन आदी बाबींची गरज नाही. तुमच्या घरातील सायकल असल्यास नाममात्र किंमतीमध्ये त्याला मशीन बसवून दिले जाते, असेही अतुल पाटील यांनी सांगितले.

E-cycle

अशा प्रकारच्या ई-सायकली नामांकित कंपन्यांही बनवतात. पण त्या प्रचंड महाग असतात. तसेच त्या सर्वत्र मिळतही नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कमी मायलेज देतात. त्यामुळे स्वस्त मस्त प्रवास करता येत नाही. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांना कमी किमतीमध्ये परवडणारी सायकल बनवण्याचा ध्यास लॉकडाऊनच्या काळामध्ये अतुल आणि अमोल या दोन भावंडांनी घेतला होता. शेतकरी कुटुंबातील अमोल काही काळ पुणे येथे नोकरी करत होते. पण स्वतःचा काहीतरी आविष्कार घडवण्याच्या जिद्दीने त्या दोघांनी ही ई-सायकल तयार केली आहे.

 

ज्यांचा प्रवास कमी आहे अशांसाठी कमी क्षमतेची बॅटरी वापरली आहे. तर सर्वाधिक ११० किलोमीटर एव्हरेज देणारी बॅटरी ही वेगळ्या पद्धतीची वापरली आहे. यात आणखी सुधारणेसाठी अधिक नव्याने बांधणी केली जात आहे. पर्यावरणपूरक असल्याने कोणतेही प्रदूषण नाही. तसेच बॅटरी संपल्यास पायडलचा वापर करून सायकल चालवू शकतो.

 

सध्या बाजारातील सायकलीचा वापर करून मशिनरी बसवली जात आहे. लवकरच नामांकित कंपन्यांकडून सुट्टे भाग घेऊन स्वतःचे मॉडेल तयार करणार असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले. साधारण पाच तासांचा कालावधी चार्जिंग साठी लागत असल्याने पाच ते सहा रुपये खर्च येतो आणि त्यावर साधारण सत्तर ते एकशे दहा किलोमीटर सरासरी मायलेज मिळत आहे. घरातील टाकाऊ बॅटरी ही पुन्हा वापरात आणण्याचाही उद्योग लवकरच उभारण्याचेही त्यांच्या डोक्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरेदी किंवा घरातील सायकल बनावटीबाबत अनिरुद्ध बडवे 9226227627, अमोल कुलकर्णी 9922767696 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन अतुल पाटील यांनी केलं आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: E-cycleअतुल पाटीलअनिरुद्ध बडवेइलेक्ट्रॉनिक सायकलमहाराष्ट्रसोलापूर
Previous Post

पाच जिल्ह्यांमधील जिप, पंस पोटनिवडणुका १९ जुलैला, पालघर कोरोना ओसरल्यावर!

Next Post

गृहिणींची बचत आयकरापासून सुरक्षित…आयकर प्राधिकरणाचा निर्णय

Next Post
income tax

गृहिणींची बचत आयकरापासून सुरक्षित...आयकर प्राधिकरणाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!