Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवज्योत सिद्धूच्या कोठडीत सोबतीला ड्रग आरोपी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Navjyot Singh Sidhu

मुक्तपीठ टीम

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात एका वर्षासाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान पटियाला कोठडीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे समोर आले आहे. सिद्धू यांना बॅरेक क्रमांक १० मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आपल्या राजकीय कारकिर्दीत ड्रग्जचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सिद्धू यांच्यासह या बॅरेकमध्ये ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपीला ठेवण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले. कारागृह कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे.

बडतर्फ इन्स्पेक्टरसोबत सिद्धू यांना ठेवले

  • शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास औपचारिकता पूर्ण करून सिद्धू यांना बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.
  • त्यांना ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे सीआयएचे माजी इन्स्पेक्टर इंद्रजित सिंग यांनाही कैद करण्यात आले होते.
  • इंद्रजित सिंग यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
  • त्याच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीत हात असल्याचा आरोप आहे.
  • २०१७ मध्ये इंद्रजीत सिंगच्या घरातून एके-47 सह अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
  • या संपूर्ण प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे.

अमली पदार्थ विरोधी मोहिमेमुळे सिद्धू हिटलिस्टवर

  • तुरुंग विभागाच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबच्या तुरुंगात यापूर्वीही हत्या झाल्या आहेत आणि सिद्धू त्याच्या अंमली पदार्थ विरोधी भूमिकेमुळे अशा लोकांच्या हिटलिस्टवर आहे.
  • सिद्धूच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, तुरुंग प्रशासनाने सिद्धूसोबत बॅरेक्स शेअर केलेल्या कैद्यांची पार्श्वभूमी तपासायला हवी होती.
  • अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्धची त्यांची भूमिका लक्षात घेता आजूबाजूच्या लोकांवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे.
  • आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबमधील कोणताही कैदी, ज्याला अमली पदार्थांच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे, त्याला अंमली पदार्थांच्या व्यापारातील “मोठ्या माशांशी” जोडला जाऊ शकतो.
  • यामुळे सिद्धू तसेच एसएडी नेते बिक्रम सिंह मजिठिया यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

सुरक्षेचा प्रश्न नसल्याचा जेल प्रशासनाचा दावा…

  • या मुद्द्यावर कारागृह अधीक्षक मनजीत तिवाणा यांनी सांगितले की, अशी माहिती सार्वजनिक करू नये.
  • मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.
  • मात्र, तुरुंग मंत्री हरजोत बैंस यांच्याशी संलग्न कर्मचारी म्हणाले की, वरिष्ठ तुरुंग अधिकारी या विषयावर भाष्य करतील.
  • नंतर, तुरुंग विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बडतर्फ केलेले पोलीस कर्मचारी इंद्रजित सिंग सिद्धूसोबत बॅरेकमध्ये सामायिक करत असल्याचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी त्याला दुसरी हलवण्याचे आदेश दिले होते.
  • इंद्रजितला दुसऱ्या बॅरेकमध्ये नेण्यात आल्याचे तुरुंग कर्मचाऱ्यांनी सांगितले.
  • या प्रकरणातील त्रुटींची दखल घेतली जाईल.
  • कारागृहात सुरक्षेची कोणतीही समस्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

Tags: Drug AccussedNavjyot Singh Sidhupunjabड्रग आरोपीनवज्योत सिंग सिद्धूपंजाबसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गायीच्या दुधाला लिटरमागे ५० रुपयांची मागणी! गोठ्यावर शेतकऱ्यांशी महादेव जानकरांचा संवाद!!

Next Post

सीबीएसईने बदलला परीक्षेचा पॅटर्न, ३० टक्के पर्यायी प्रश्न कमी केले!

Next Post
CBSE

सीबीएसईने बदलला परीक्षेचा पॅटर्न, ३० टक्के पर्यायी प्रश्न कमी केले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!