मुक्तपीठ टीम
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात एका वर्षासाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान पटियाला कोठडीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे समोर आले आहे. सिद्धू यांना बॅरेक क्रमांक १० मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आपल्या राजकीय कारकिर्दीत ड्रग्जचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सिद्धू यांच्यासह या बॅरेकमध्ये ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपीला ठेवण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले. कारागृह कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे.
बडतर्फ इन्स्पेक्टरसोबत सिद्धू यांना ठेवले
- शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास औपचारिकता पूर्ण करून सिद्धू यांना बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.
- त्यांना ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे सीआयएचे माजी इन्स्पेक्टर इंद्रजित सिंग यांनाही कैद करण्यात आले होते.
- इंद्रजित सिंग यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
- त्याच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीत हात असल्याचा आरोप आहे.
- २०१७ मध्ये इंद्रजीत सिंगच्या घरातून एके-47 सह अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
- या संपूर्ण प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे.
अमली पदार्थ विरोधी मोहिमेमुळे सिद्धू हिटलिस्टवर
- तुरुंग विभागाच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबच्या तुरुंगात यापूर्वीही हत्या झाल्या आहेत आणि सिद्धू त्याच्या अंमली पदार्थ विरोधी भूमिकेमुळे अशा लोकांच्या हिटलिस्टवर आहे.
- सिद्धूच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, तुरुंग प्रशासनाने सिद्धूसोबत बॅरेक्स शेअर केलेल्या कैद्यांची पार्श्वभूमी तपासायला हवी होती.
- अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्धची त्यांची भूमिका लक्षात घेता आजूबाजूच्या लोकांवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे.
- आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबमधील कोणताही कैदी, ज्याला अमली पदार्थांच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे, त्याला अंमली पदार्थांच्या व्यापारातील “मोठ्या माशांशी” जोडला जाऊ शकतो.
- यामुळे सिद्धू तसेच एसएडी नेते बिक्रम सिंह मजिठिया यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
सुरक्षेचा प्रश्न नसल्याचा जेल प्रशासनाचा दावा…
- या मुद्द्यावर कारागृह अधीक्षक मनजीत तिवाणा यांनी सांगितले की, अशी माहिती सार्वजनिक करू नये.
- मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.
- मात्र, तुरुंग मंत्री हरजोत बैंस यांच्याशी संलग्न कर्मचारी म्हणाले की, वरिष्ठ तुरुंग अधिकारी या विषयावर भाष्य करतील.
- नंतर, तुरुंग विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बडतर्फ केलेले पोलीस कर्मचारी इंद्रजित सिंग सिद्धूसोबत बॅरेकमध्ये सामायिक करत असल्याचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी त्याला दुसरी हलवण्याचे आदेश दिले होते.
- इंद्रजितला दुसऱ्या बॅरेकमध्ये नेण्यात आल्याचे तुरुंग कर्मचाऱ्यांनी सांगितले.
- या प्रकरणातील त्रुटींची दखल घेतली जाईल.
- कारागृहात सुरक्षेची कोणतीही समस्या नसल्याचा दावा त्यांनी केला.