Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिनी ओप्पो मोबाइलची ४ हजार ३८९ कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघड! DRIची कामगिरी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
DRI And Oppo

मुक्तपीठ टीम

डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या विशेष चौकशीत ओप्पो मोबाइल या चीनी कंपनीची ४ हजार ३८९ कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी पकडण्यात आली आहे. “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या ओप्पो मोबाईल्स इंडिया या कंपनीने ४ हजार ३८९ कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविल्याचे उघडकीस आले आहे.

ओप्पो इंडिया ही कंपनी भारतात मोबाईल फोन आणि फोनशी संबंधित इतर वस्तूंचे उत्पादन, जोडणी, घाऊक विक्री तसेच वितरण या व्यवहारांचे संचालन करते. ओप्पो, वन प्लस आणि रियलमी यांसह मोबाईल फोनच्या विविध ब्रँडसंदर्भात ओप्पो इंडिया कंपनी कार्यरत आहे.

उपरोल्लेखित चौकशीदरम्यान डीआरआयतर्फे ओप्पो इंडिया कंपनीच्या विविध कार्यालयांचे परिसर तसेच कंपनीच्या महत्त्वाच्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी अनेक तपासणी सत्रे राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान, मोबाईल फोन्सच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी आयात केलेल्या काही सामग्रीच्या वर्णनात चुकीचे दावे करण्यात आल्याचे दर्शविणारे दोषपूर्ण पुरावे सापडले आहेत. या चुकीच्या दाव्यांमुळे ओप्पो इंडिया कंपनीला पात्र नसताना 2,981 कोटी रुपयांची कर माफी मिळाल्याचे दिसू आले. या चौकशीमध्ये, व्यवस्थापन पातळीचे वरिष्ठ कर्मचारी, ओप्पो इंडिया कंपनीने नेमलेले देशांतर्गत पुरवठादार तसेच इतरांची कसून चौकशी करण्यात आली. सदर सामग्री आयात करतेवेळी, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर चुकीचे वर्णन सादर केल्याची कबुली या सर्वांनी स्वखुशीने दिली आहे.

चौकशीदरम्यान असे देखील आढळून आले की ओप्पो इंडिया कंपनीने चीनमधील कंपन्यांसह विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘रॉयल्टी’ तसेच ‘परवाना शुल्क’ या शीर्षकाखाली रक्कम हस्तांतरित केली आहे किंवा तशा प्रकारची तरतूद केली आहे. ओप्पो इंडिया तर्फे भरण्यात आलेली ‘रॉयल्टी’ तसेच ‘परवाना शुल्का’ची रक्कम आयातीच्या वेळी वस्तूंच्या मूल्यामध्ये धरण्यात आली नव्हती. असे करण्यामुळे सीमाशुल्क कायदा, १९६२ मधील विभाग क्र.१४ तसेच सीमा शुल्क मूल्यांकन (आयात वस्तूंच्या मूल्याचे निर्धारण) नियम २००७ मधील नियम क्र. १० मधील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. या शीर्षकाखाली ओप्पो इंडिया कंपनीने १,४०८ कोटी रुपये बुडविल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे.

विहित रकमेपेक्षा कमी सीमा शुल्क भरल्याबद्दल रकमेतील तफावत अंशतः भरून काढण्यासाठी ओप्पो इंडिया कंपनीने स्वयंस्फूर्तपणे ४५० कोटी रुपये सरकारकडे जमा केले आहेत.

चौकशीअंती, ओप्पो इंडिया कंपनीला करणे दाखवा नोटीस जारी करण्यात करण्यात आली असून त्यात ४,३८९ कोटी रुपयांचे सीमाशुल्क भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या नोटिशीद्वारे ओप्पो इंडिया कंपनी, तिचे कर्मचारी तसेच ओप्पो चीन या सर्वांना सीमा शुल्क कायदा, १९६२ अन्वये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे.


Tags: Chinese Oppo MobilesDRIOppo Mobiles IndiaTax Evasionओप्पो मोबाईल्स इंडियाचिनी ओप्पो मोबाइलसीमा शुल्क चोरी
Previous Post

पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

Next Post

थायलंडमध्ये बलात्कारी नराधमांना नंपुसक करण्याची शिक्षा! भारतात का अडलीय ही शिक्षा?

Next Post
India Thailand SC

थायलंडमध्ये बलात्कारी नराधमांना नंपुसक करण्याची शिक्षा! भारतात का अडलीय ही शिक्षा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!