Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी डीआरडीओचे ‘शक्ती’ संरक्षक इलेक्ट्रॉनिक युद्ध कवच

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
drdo

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, झांसी इथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’कार्यक्रमाचा भाग म्हणून नौदलाच्या जहाजांना संरक्षक कवच पुरवणारी प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ई डब्ल्यू (EW) ‘शक्ती’ ही प्रणाली औपचारिकरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली गेली.
प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ई डब्ल्यू (EW) ‘शक्ती’ चे डिझाईन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या हैद्राबाद येथील संरक्षण इलेक्ट्रॉनिक संशोधन प्रयोगशाळेत बनले असून तेथेच ते विकसित करण्यात आले आहे.

 

भारतीय नौदलाच्या प्रमुख युद्धनौकांवरुन शत्रूच्या पारंपरिक आणि आधुनिक रडारच्या कामात व्यत्यय आणणे, ते शोधून काढणे, त्यांचे वर्गीकरण करणे, ओळख पटविणे आणि ते निकामी करणे यासाठी ही प्रणाली उपयोगात आणली जाईल. सागरी युद्धात, शक्ती ई डब्ल्यू (EW) प्रणाली आधुनिक रडार आणि नौका विरोधी क्षेपणास्त्रे यापासून इलेक्ट्रॉनिक कवच देऊन वर्चस्व आणि टेहळणीची क्षमता देईल. भारतीय नौदलाच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीची जागा , ही नवी प्रणाली घेईल.

 

भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर्स आणि इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स प्रणालीशी या प्रणालीचे एकात्मिकरण करण्यात आले आहे. या प्रणालीचे ईएसएम आधुनिक रडारची दिशा बिनचूक शोधून त्यात व्यत्यय आणण्यास मदत करते. मोहिमा पार पडल्यानंतर विश्लेषण करण्यासाठी या प्रणालीत अंगभूत रडार फिंगरप्रिंटींग आणि माहिती नोंदणी करण्याची सोय आहे.

 

पहिली शक्ती प्रणाली आयएनएस विशाखापट्टणम या जहाजावर बसविण्यात आली आहे आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतवर बसविण्यात येत आहे. एकूण 1805 कोटी रुपये खर्चून, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे बारा शक्ती प्रणाली बनविल्या जात आहेत. यात पन्नासपेक्षा जास्त सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे. ही प्रणाली सध्या तयार होत असलेल्या, P-15B, P-17A आणि तलवार श्रेणीच्या लढाऊ युद्ध नौकांसह, मुख्य युद्ध नौकांवर बसवली जाणार आहे.

 

शक्ति ई डब्ल्यू (EW) प्रणाली यशस्वीपणे विकसित केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योजकांचे अभिनंदन केले आहे. या प्रणालीमुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढणार असल्याचे सांगत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचे सांगितले. डीडीआरडी चे सचिव आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी या प्रणालीच्या विकसनाशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. नौदलाच्या इलेक्ट्रॉनिक गुप्तचर क्षमतेत यामुळे अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Tags: ‘शक्तीDRDOIndian NavyIndian Navy shipsmuktpeethShakti deviceडीआरडीओभारतीय नौदल जहाजेयुद्ध कवचसंरक्षक इलेक्ट्रॉनिक उपकरण
Previous Post

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

Next Post

बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत १५ जागांवर नोकरीची संधी

Next Post
bob

बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत १५ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!