Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशासाठी महाराष्ट्र सदैव दिशा दर्शक – डॉ. विजय चोरमारे

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेची सुरुवात

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
महाष्ट्र हीरक महोस्तव व्याख्यानमालेत आज डॉ. विजय चोरमारे यांनी पहिले पुष्प गुंफले

डॉ. विजय चोरमारे

सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राने देशाला विविध महत्वाचे कायदे, योजना दिल्या असून सामाजिक व राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेल्या महाराष्ट्र हीरक महोत्सवी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावर ते बोलत होते.

भारत देशाला महाराष्ट्राने विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगून आजचा महाराष्ट्र ‘शिव- फुले-शाहु-आंबेडकरांच्या’ कार्यावर व विचारांवर उभा आहे व पुढच्या काळातही राज्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसे करावे याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण महात्मा फुले यांनी दिली.

राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे याची शिकवण छत्रपती शाहुंनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तिन्ही महापुरुषांच्या कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी राज्यघटनेत अंतर्भूत केल्या असून आधुनिक काळात हे विचार महाराष्ट्रासह देशाच्या सर्वसमावेशक विकासाला पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने देशाले दिले महत्वपूर्ण योगदान

छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी 26 जुलै १९०२ रोजी ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारल्याचे दिसते असे डॉ. चोरमारे म्हणाले. १९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेच्या हाताला काम मिळावे म्हणून महाराष्ट्राने ‘रोजगार हमी योजना’ राबविली. थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक होत. त्याआधी १८९६- ९७ च्यापूढे कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी अशी योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावाने राबविली जाते.

महाराष्ट्रानेच देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली. पुढे देश पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा कायदा झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रगल्भ समाजकारण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा पुढे ठेवून समोर आलेल्या प्रश्नांची उकल केली. आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्राला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले.

सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतराव चव्हान यांनी राज्यातील जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट करण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. वेदना, नकार, विद्रोह या सूत्राच्या आधारे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात ही चळवळ उभी राहिली. ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत, उपेक्षित समाजाला आत्मभान दिल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक जोड असल्याशिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. बाबा आमटे, नानाजी देशमुख,अण्णा हजारे यांच्या सामाजिक कार्यातील योगदानावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला . बाबा आढावांनी सुरु केलेली ‘एक गाव एक पानवठा’ ही समृध्द सामाजिक चळवळ होती. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी राबविलेली अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ ठरल्याचे सांगत राज्यातील जादुटोणा विरोधी विधेयक यादृष्टीने महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ असून त्यास शिक्षणाची जोड असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे, पंजाबराव देशमुख आदींनी महाराष्ट्राच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोचवली. वसंतदादा पाटील यांच्या काळात महत्वाचे शिक्षण धोरण ठरले . परिणामी राज्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्याचे त्यांनी सांगितले.

 


Tags: ‘शिव- फुले-शाहु-आंबेडकरdr. vijay chormareVha Abhivyaktडॉ. विजय चोरमारेव्हा अभिव्यक्त
Previous Post

आज २५,६८१ नवे बाधित, सक्रिय रुग्णसंख्या पावणे दोन लाखावर, ४८ तासात ४३ मृत्यू

Next Post

जॅान अब्राहमचे सलमान खानला आव्हान

Next Post
john & salman

जॅान अब्राहमचे सलमान खानला आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!