Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वारी, पालखी सोहळा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव” – डॉ. सदानंद मोरे

July 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr Sadanand More Speaking in 'Pandharichi Wari' organized by Lokmanya Hasyayog Sangh Parivar

मुक्तपीठ टीम

“संतांनी महाराष्ट्राला सलोखा, समतेचा, मूल्यांचा वारसा दिला. ज्ञानेश्वर ते निळोबा यांच्यापर्यंत संतांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केली आहे. मोठी परंपरा असलेली वारी ही विठ्ठलाची उपासना आहे. वारकरी नाही असे एकही गाव महाराष्ट्रात नाही. लाखोंच्या संख्येने एकत्रितपणे भक्तिरसात न्हाऊन निघणारा वारीचा, पालखी सोहळा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
Dr Sadanand More Speaking in 'Pandharichi Wari' organized by Lokmanya Hasyayog Sangh Parivar
आषाढी एकादशीनिमित्त लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या वतीने आयोजित ‘पंढरीची वारी’वरील व्याख्यानात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. व्याख्यानासह दिंडी सोहळा, विठ्ठल-रुक्मिणी पूजन, अभंग गायन झाले. कोथरूड येथील राजलक्ष्मी सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, उपाध्यक्ष डॉ. जयंत मुळे, उपाध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, माजी नगरसेविका वैशाली मराठे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, महेश साने, जयंत भिडे आदी उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “पंढरीच्या वारीला मोठी परंपरा आहे. वारी ही सामुदायिक उपासना आहे. दिंडी हे वारीचे युनिट असून, मृदुंग, टाळ व वीणा यांच्या स्वरांतून आणि वारकऱ्यांच्या सुरांतून निर्माण होणारा भक्तिरस अवर्णनीय आहे. मासिक, तिथी, आषाढी-कार्तिकी किंवा आषाढी वारी करण्याची प्रथा आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या आधीपासून वारी सुरु आहे. नारायणबाबांनी वरील पालखी सोहळ्यात आणले. वारकरी आणि विठ्ठल हे नाते घट्ट आहे. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद नसणारा हा सोहळा आहे. “
“आजच्या काळात प्रत्येकजण विश्वाशी जोडू शकतो. मात्र, संतांनी वारीच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचे काम केले. वारीने महाराष्ट्राला ‘नेटवर्किंग’ दिले. संत साहित्याने परमार्थाची, हास्यपूर्ण जगण्याची शिकवण दिली. नितीधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीराजे, राजराम महाराज, राणी ताराबाई, शाहू महाराज यांनी वारीला संरक्षण दिले. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी वारीचे महात्म्य कायम आहे,” असे डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात डॉ. सुभाष देसाई म्हणाले, “आषाढीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दरवर्षी आम्ही इथेच पंढरपूरचा सोहळा साजरा करतो. आपण हास्ययोगाचेही वारकरी आहोत. विठ्ठलनामाच्या साधनेइतकीच हास्ययोगाची साधना गरजेची आहे. सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, प्रतिकारशक्ती वाढावी, तसेच ताणतणाव दूर राहावेत, यासाठी हास्ययोग साधा, सोपा व बिनखर्चाचा प्रभावी उपाय आहे. हास्ययोगाला वैज्ञानिक, अध्यात्मिक बैठक आहे. लोकमान्य हास्ययोग संघाच्या परिवारात वाढ होत असून, आज ७० शाखातुन चार हजार लोक सहभागी होत आहेत.”
तत्पूर्वी, सकाळी विठ्ठल-रुक्मिणी पूजन, पालखी सोहळा व दिंडी प्रदक्षिणा झाली. कुंदा पानसे यांच्या सुमधुर अभंग गायनाने भक्तिरसाची अनुभूती दिली. लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेविषयी शरद महाबळ यांनी माहिती दिली. डॉ. प्रसाद आंबीकर व डॉ. मानसी आंबीकर यांनी ओघवते सूत्रसंचालन केले. अनुराधा भांडारकर यांनी आभार मानले.

Tags: Dr. sadanand moreLokmanya Hasyayog Sangh ParivarPandharichi Wariडॉ. सदानंद मोरेपंढरीची वारीलोकमान्य हास्ययोग संघ परिवार
Previous Post

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय – जयंत पाटील

Next Post

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराआधीच वाद: भाजपाला जयस्वाल नको, आरपीआयला मनसे!

Next Post
आशिष जयस्वाल, राज ठाकरे रामदास आठवले

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराआधीच वाद: भाजपाला जयस्वाल नको, आरपीआयला मनसे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!