डॉ.सच्चिदानंद शेवडे
श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा.
आपला हा सण आपण उत्साहात साजरा करायचा यात वाद नाही, पण त्याचवेळी सामाजिक परिस्थिती व सध्याचे कोरोनाचे भानही हवे. आपल्या वर्तनाने उत्सवाला गालबोट न लागू देण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणी चुकत असेल तर नीट आणि योग्य शब्दात त्याला दुरुस्त करायला हरकत नाही. आता पुढचे अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस, यंदा काळजी घेत सावधपणे पार पडायला हवेत. यात कोठे तरी देश परिस्थितीची जाणीव आणि भान असावे!
हा उत्सव बुद्धीदात्याचा आहे आणि बलदात्याचाही आहे..!!
देशवासियांना सुखी ठेव, कोरोना संकट नाहीसे कर, देशशत्रूंना धडा शिकव, देवा-धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा घाल, महागाई आटोक्यात येऊ दे, देश खरोखरच बलवान होऊ दे, भ्रष्टाचार करणारे मातीत जाऊ दे, स्त्री सन्मान होऊ दे, शेतकरी व अन्य सर्वजण सुखी होऊ देत आणि हिंदूंचे डोळे उघडू दे! या व अशा अनेक प्रार्थना करता येतील पण धर्मो रक्षति रक्षीत: हे ध्यानात ठेवायला हवे.
देव येईल आणि हे सर्व करील, असे नसते, तर तो आपल्याला तसे करण्याची बुद्धी देतो हेच खरे! तशी सर्वांना मिळो हीच त्या विघ्नहर्त्याच्या पायी प्रार्थना..!!
अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णम्|
परम् निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम||
जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गणेशम्|
जगद्व्ययापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम||
(डॉ. सच्चिदानंद शेवडे हे मराठी लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार आहेत. त्यांनी Historical and Cultural Studies of Kashmir या विषयावर डॉक्टरेट प्राप्त केली आहे.)