मुक्तपीठ टीम
आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्याचे ध्येय ठेवले तर, घाबरून चालत नाही. शेवटी डर के आगे जीत है. एखादी गोष्ट ठरवली आणि ती न घाबरता मिळवली तर त्याचे यश हे वेगळेच असते. असाच एक विजय एका डॉक्टर महिलेने मिळवला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका डॉक्टर महिलेने गोव्यात आयोजित जगातील सर्वात मोठी आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आहे.
आपल्या भितीवर मात करत, आयरनमन चँपियनशिपमध्ये दिला लढा…
- भोपाळ येथील डॉ. प्रिया भावे चित्तावरने आयरनमन चँपियनशिप या स्पर्धेत १९०० मीटर शर्यत जिंकली आहे.
- गोव्यात आयोजित जगातील सर्वात मोठी आयर्नमॅन चॅम्पियनशिप तिने पूर्ण केली आहे.
- चॅम्पियनशिपमध्ये १६००हून अधिक स्पर्धक होते. एक हजाराहून अधिक भारतीय होते. इतर ६०० हे दुसऱ्या देशांतील होते.
- आयर्नमॅनमध्ये, एका सहभागीला १९०० मीटर पोहणे, ९० सायकलिंगसह २१ किमी धावणे असे कार्य दिले जाते.
- डॉ.प्रिया यांनी हे तिन्ही कामं पूर्ण केले. हे करण्यासाठी ती मध्य प्रदेशातील दुसरी आणि व्यावसायिक डॉक्टर म्हणून राज्यातील पहिली महिला ठरली आहे.
- याआधी लष्करातून निवृत्त झालेल्या पूनम जोशी यांनी चार वर्षांपूर्वी आयर्नमॅन पूर्ण केले होते.
पाण्याची भीती असतानाही एक प्रेरणादायी उदाहरण दिले!
- ४५ वर्षीय डॉ. प्रिया सांगते की, या चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी ती पहाटे चार वाजता उठायची.
- स्मार्टवॉचच्या मदतीने सायकलच्या वेगानुसार धावण्याचा वेग, हार्ड डेटा, वर्कआउट करायची. त्यासाठी प्रशिक्षक फोनवरून मदत करायचे.
- पाण्याची भीती असतानाही या वर्षी जुलैमध्ये पाच महिन्यांपूर्वी पोहण्यास शिकली.
- या चॅम्पियनशिपसाठी तलावामध्ये काही महिने १९०० मीटर पोहण्याचा सराव केला. त्यानंतर पहिल्यांदा गोव्याच्या समुद्रात पोहली आणि ५७ मिनिटांत हे टास्क पूर्ण केले.
डॉ. प्रिया भावे चित्तावरची करिअर लाइफ
- डॉ. प्रियाला दोन मुले आहेत. १९ वर्षांचा मुलगा बंगळुरूमध्ये शिकत आहे.
- तर दुसरा मुलगा शालेय शिक्षण घेत आहे.
- डॉ. प्रिया गायनॉकोलॉजिस्ट तज्ज्ञ आहे. ती अपत्यहीन जोडप्यांवर उपचार करते.