Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय नियोजन करा”

अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

October 9, 2021
in सरकारी बातम्या
0
vaccination

मुक्तपीठ टीम

राज्यातील शहरातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.

 

राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. येत्या १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डॉ. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.

 

दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे

सर्व आयुक्तांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक घ्यावी. बैठकीत महसूल, शिक्षण, महिला बालविकास, नगरविकास अशा विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे, लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय नियोजन करावे, कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करावे, एका प्रभागाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लसीकरण करावे. पहिल्या डोसचे प्राधान्याने आणि दुसरा डोस देय असलेले लसीकरण करावे, लसीकरणाकरिता डॉक्टर, अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, इंटर्नस यांनी व्हैक्सिनेटर म्हणून काम करावे, लसीकरण सत्रापुर्वी दोन दिवस अगोदर जनजागृती करावी. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा, समाजमाध्यमे यांचा वापर करावा, उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी सत्रांचे नियोजन करावे.


Tags: coronaDr. Pradeep Vyasvaccinationकोरोना टास्क फोर्सडॉ.प्रदीप व्यासमहानगरपालिका आयुक्त
Previous Post

“नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सिडकोने केलेले काम कौतुकास्पद”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय भाजपालाच”

Next Post
narayan rane

"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय भाजपालाच"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!