Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा!”

March 12, 2022
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
corona pranaam

डॉ. प्रदीप आवटे

९ मार्चला महाराष्ट्रातील पहिली कोरोना केस आढळून २ वर्षे पूर्ण झाली. कोरोना पॅन्डेमिक ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. मानव प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे,असे मानले जाते. अर्थात हे आपलं कौतुक आपण मानवच करत असतो.

 

कोरोना पॅन्डेमिकमधून या बुध्दिमान माणसाने काय बोध घेतला, हे ही या टप्प्यावर समजावून घ्यायला हवे.

मागील दोन वर्षांमध्ये जगभरात साडेचार कोटीहून अधिक लोकांना कोविडची बाधा झाली आणि ६० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू या महामारीमध्ये झाला आहे. आणि अजूनही ही महामारी धड संपलेली देखील नाही आणि या महामारीमध्ये मेलेली माणसे, या महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान कमी आहे म्हणून की काय, या बुद्धिमान मानवी जातीतील एक देशाने म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रोज शेकडो माणसे मरत आहेत.आंतरराष्ट्रीय टेन्शन इतके वाढते आहे की जग आण्विक युध्दाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे की काय,अशी भीती वाटते आहे.आता तेलाच्या किमती वाढून जगभरातील आर्थिक व्यवस्था अजून डबघाईस येईल,ते वेगळेच. युनो, नाटो,युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय यंत्रणा प्रयत्न तर करताहेत पण…काहीच सकारात्मक घडत नाही.

 

कोणता बुध्दिमान प्राणी महामारीच्या काळात असे युद्ध नाहक सूरु करु शकतो? १९१८ च्या स्वाईन फ्ल्यू पॅन्डेमिकमुळे पहिले महायुध्द संपले असे मी अभ्यासले होते. पण यावेळी उलटेच घडले. मागील शंभर वर्षात मानवी बुध्दिमत्तेमध्ये झालेली ही वाढ कौतुकास्पदच आहे.

 

कोरोना महामारीमुळे आपल्याकडील शाळा कॉलेज मागील दोन वर्षापासून बंद होत्या. यामुळे परिघावरील समाजातील खूप मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडली आहेत. उगवत्या पिढीचे भवितव्य यामुळे संकटात सापडले आहे. आपण आपली एक पिढीच महामारीच्या शिक्षणावर झालेल्या परिणामामुळे गमावत असल्याची भीती अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आता कुठं शाळा कॉलेज सूरु होत असताना आपल्याकडे कर्नाटकात हिजाब प्रश्न उपस्थित होऊन त्या वादात शाळा कॉलेज काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली. वाद एवढा पेटला की त्यात एका तरुण मारला गेला. खरे म्हणजे असे सारे वाद बाजूला ठेवून शाळा कॉलेज सुरळीत सुरु होणे आवश्यक असताना आपण सारेच नको त्या वादात अडकून पडलो. असे वाद सहमतीने सोडवून मुलांच्या शाळा कॉलेज नीट सुरु करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे होते. पण झाले ते भलतेच! महामारीतून आपण शिकतो ते असे आणि तरीही आपण मानव बुद्धिमान ?

 

युक्रेन युध्दामुळे भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी देशाबाहेर का जात आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न किमान उपस्थित झाला. जसे काही हे आपल्याला पहिल्यांदाच कळाले. कोविड आजाराचे आपल्या देशातील पहिले काही रुग्ण हे केरळमधून वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेली मुले होती. तेव्हा जणू हा विषय आपल्या गावीही नव्हता. आणि आज अचानक हा विषय आपल्या ध्यानी आला. हरकत नाही, देर आये दुरुस्त आये पण आता तरी शिक्षणसम्राटांच्या, कार्पोरेटच्या दावणीला बांधलेले वैद्यकीय शिक्षण आपण मुक्त करणार आहोत का? तशी आपली राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आहे का?

 

नुकत्याच आपल्याकडे पाच राज्यात निवडणुका झाल्या. कोरोना महमारीच्या छायेत या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य या विषयावर साधक बाधक चर्चा होईल ,अशी अनेकांची अपेक्षा होती. पण असे काहीच झाले नाही. या साऱ्या निवडणुकींच्या भाषणामध्ये, माध्यमावरील चर्चेमध्ये, विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सार्वजनिक आरोग्याचा विषय अपवादानेच चर्चेला आला. एवढ्या मोठ्या आरोग्य विषयक संकटातून आपण जात असताना देखील आरोग्यविषयक भविष्यकालीन नियोजन आपल्या सार्वजनिक चर्चेचा महत्त्वाचा विषय होऊ नये, याला काय म्हणावे ?

 

गरज सरो वैद्य मरो,अशी म्हण का पडली असावी,असा प्रश्न मला नेहमी पडतो. केवळ वैदयच नव्हे तर गरज संपली की आख्ख्या सार्वजनिक आरोग्याचा विसर आपल्याला पडतो,असे दिसते आहे. आणि तरीही आपण पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहोत, कोई शक ?

 

सॉरी टू से, पण कोरोनाने शिकवलेले धडे खरेच आपण मनापासून गिरवतो आहोत का?

हे युद्ध, हे विनाकारण उभे केलेले वाद ,आजही एक समाज म्हणून सार्वजनिक आरोग्याकडे आपण करत असलेले दुर्लक्ष हे पाहिले तर आपण हात जोडून एकच वाक्य नम्रपणे म्हणू शकतो,

 

कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा !

Pradeep Awate

(डॉ प्रदीप आवटे हे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत)


Tags: coronacovidMaharashtraकोरोनाकोविडडॉ. प्रदीप आवटे
Previous Post

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ

Next Post

बसपाची अशी कशी बर्बादी…यूपीत एक कोटी मतं, जागा मात्र एकच!

Next Post
mayawati

बसपाची अशी कशी बर्बादी...यूपीत एक कोटी मतं, जागा मात्र एकच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!