Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी!”

पालकांमध्ये पसरलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदिप आवटे यांचा दिलासा

September 5, 2026
in आरोग्य
0
corona mpact on children

डॉ. प्रदिप आवटे

कोरोनाची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती पॅनिक समाजामध्ये पसरलेले दिसते आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे,असे म्हणता येणार नाही. १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही.

 

बालरोग तज्ञांच्या संघटनेने देखील हे सुस्पष्ट केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात –

  • तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणे कठीण आहे.
  • मोठ्या माणसाप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोना होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटे मध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
  • ९० टक्के मुलांमधील कोरोना सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे.
  • काही मुलांना आय सी यू ची गरज लागू शकते पण त्यांचे प्रमाण फार मोठे नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.

 

लहान मुलांमध्ये या विषाणूच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट रिसेप्टर विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत. सध्या माध्यमे राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत. मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोरोना मुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिले आहे.

 

हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखावरुन दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही.

Corona impact on children graph

सोबतचा हा आलेख पाहा. या मध्ये पाहिले तर मागील सहा महिन्यात एकूण कोरोना रूग्ण संख्येच्या तुलनेत वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या प्रमाणात फारसा बदल झालेला दिसत नाही.म्हणजेच मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण स्थिर आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुले जरी कोरोना बाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.  आपण अगदी मे महिन्याचे उदाहरण घेतले तरी अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.०७ एवढे आहे.  साधारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो,असे हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.

 

लहान मुलांच्या इलाजासाठी तयारी करणे चांगलेच, पण भीती पसरवू नका!

  • लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढू शकते हे भाकीत मनावर घेऊन आपण त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे.
  • कोणतीही तयारी वाया जात नाही. परंतु त्यामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे फारसे हितावह नाही.
  • आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा.

तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.

 

(डॉ. प्रदीप आवटे हे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत. साथीच्या आजारांवर लक्ष ठेवणे, त्यांची सांख्यिकी मिळवून विश्लेषण करून उपाययोजना सुचवणे यात ते तज्ज्ञ आहेत. त्यांचे कोरोना संकट काळातील अथक, निरंतर कार्य महत्वाचे आहे.)

 


Tags: corona third waveDr Pradeep Awateडॉ. प्रदिप आवटेतिसरी लाट लहान मुलेमुलांना कोरोना
Previous Post

मीठाच्या पाण्याने कोरोना चाचणी, फक्त तीन तासात रिपोर्ट!

Next Post

भारतीय हवाई दलात टेक्निकल, नॉन टेक्निकल पदांसाठी भरती

Next Post
indian air force

भारतीय हवाई दलात टेक्निकल, नॉन टेक्निकल पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!