Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सहभागाची गरज”

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

March 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
aadity

मुक्तपीठ टीम

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सक्रिय सहभागाची गरज असून त्यादृष्टीने प्रशासनाने याबाबत कृती आराखडा तयार करुन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृती आराखड्यातील शाश्वत विकासाची उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासंदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षणचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनीही सादरीकरण केले. पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, “गरिबी निर्मुलन करणे, भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे गरजेचे आहे. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही कृतीदर्शक आराखड्यातील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी समुहाने काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासंदर्भात कृती आराखडा तयार करावा, याद्वारे महाराष्ट्र देशातील पहिले कृतीदर्शक राज्य ठरेल”.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर शैक्षणिक करार करुन त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, त्याचा स्विकार करण्यासही सुरुवात व्हायला हवी. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, करियर समुपदेशन, योग्यता चाचणी हे विषय महत्वाचे असून, शाश्वत विकासाकडे लक्ष देऊन नव नवीन प्रयोग राबविले पाहिजे. याचबरोबर नेहमीच दुर्लक्षित राहिलेले शारिरिक आरोग्य जपणे आणि त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मिड डे मिलची गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. बचतगटामार्फत सेंट्रलाईज किचन करून गुणवत्ता राखण्याचे काम करावयास हवे. याचबरोबर संशोधन आणि विकास यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा यासाठी विविध प्रकल्प राबविणे आवश्यक आहे”.

“ग्रामीण भागाबरोबर शहरातही पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवतात. पाण्याची गुणवत्ता राखणे आवश्यक असून, त्यावर काम करणे गरजेचे आहे. पाझर तलाव, नदी या स्त्रोतांद्वारे पाणीसाठा करावयास हवा, ग्रामीण आणि शहराच्या लोकसंख्येप्रमाणे पाणीपुरवठा योग्य आणि शुद्ध प्रमाणात करणे आवश्यक आहे. सर्व बाबींचे संकलन करून कृतीदर्शक आराखड्यातील साध्य करावयाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करून कार्यवाही केल्यास उद्द‍िष्ट साध्य होईल”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


Tags: Dr.Neelam GorheEnvironment Minister Aditya Thackerayडॉ.नीलम गोऱ्हेपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
Previous Post

महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी…भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?

Next Post

जगभरात आहे चीनची सायबर दहशत, हॅकिंगच्या माध्यमातून घातपात, तंत्रज्ञान चोरी

Next Post
hack

जगभरात आहे चीनची सायबर दहशत, हॅकिंगच्या माध्यमातून घातपात, तंत्रज्ञान चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!