Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आपण मराठी भाषा जगलो, तर ती टिकेल!” – डॉ. नागनाथ कोतापल्ले

वसुधा परांजपे स्मृती पुरस्कारांचे वितरण

January 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr. Nagnath Kotapalle at Vasudha Paranjape Memorial Awards

मुक्तपीठ टीम

“ग्रामीण भागातील मुलांसाठी आधारवड ठरलेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान होते. मूलगामी स्वरूपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार देण्याचा उपक्रम प्रेरक आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.  डॉ. नागनाथ कोतापल्ले पुढे म्हणाले, “मराठी भाषा समृद्ध असून, तिचा अधिकाधिक प्रसार होण्याची आवश्यकता आहे. आपण मराठी भाषा जगलो, तर ती टिकेल. सामाजिक कार्य सहज घडत नाही. त्यासाठी समर्पित भावना असावी लागते. विकासाच्या नेमक्या संकल्पना समजून घेत आपले कार्य निश्चित करायला हवे. समितीने ग्रामीण भागातील मुलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना ‘माणूस’ घडविण्याचे काम हाती घेतले आणि गेली सहा दशके अविरतपणे ते सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत समिती आणि वसुधाताई यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान आहे.”

 

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त, व्यासंगी संपादक वसुधा परांजपे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे डॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते वितरण झाले. समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील आपटे वसतिगृहात झालेल्या सोहळ्यात वसुधा परांजपे यांचे पती ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, पुरस्कार निवड समितीच्या परिमल चौधरी आदी उपस्थित होते.

 

शैक्षणिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठातील जर्मन भाषेच्या प्राध्यापक व मराठी भाषा प्रसारक डॉ. विभा सुराणा यांना ‘वसुधा परांजपे स्मृती शिक्षणसेवा पुरस्कार’, तर सामाजिक कार्याबद्दल परिसर संस्थेचे प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ यांना ‘वसुधा परांजपे स्मृती समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुष्प व रोख ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समितीमधील पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

 

रणजित गाडगीळ म्हणाले, “पुरस्कारामुळे सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळते. ‘परिसर’चे सामाजिक कार्य अप्रत्यक्ष स्वरूपाचे आहे. त्याला हेरून समितीने हा पुरस्कार दिला, याचा आनंद आहे. शाश्वत, आरोग्यदायी आणि लोकाभिमुख विकासाचे काम संस्था करते. नागरी सुविधांच्या रचनेत सर्व घटकांचा विचार व्हायला हवा. वाहतूक व्यवस्था सुसूत्रित करण्यासाठी ‘परिसर’चे काम उपयुक्त ठरत आहे.”

 

डॉ. विभा सुराणा म्हणाल्या, “अन्य भाषिकांना मराठीचे शिक्षण देण्याच्या कार्यात अनेक सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे. हे काम आणखी प्रभावी होण्यासाठी एखादी शिखर संस्था किंवा जर्मन, फ्रेंचसारखे मराठी विद्यापीठ असावे. सरकारी पातळीवरून मान्यता देण्याची व्यवस्था व्हावी.” विजया देव यांनी सूत्रसंचालन केले. प्र. ना. परांजपे यांनी पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट केला व आभार मानले.


Tags: Dr. Nagnath KotapallemarathiVasudha Paranjape Smriti Awardडॉ. नागनाथ कोतापल्लेमराठीवसुधा परांजपे स्मृती पुरस्कार
Previous Post

अरे व्वा! १२ ते १४ वयाोगटातील मुलांनाही मिळणार लवकरच लस!

Next Post

सारा “डेटा” मेंदूत ठेवायचा आणि तिथंच अपडेटही… भाजीवाल्या मावशींचं मॅनेजमेंट डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या शब्दात

Next Post
women vegetable seller

सारा "डेटा" मेंदूत ठेवायचा आणि तिथंच अपडेटही... भाजीवाल्या मावशींचं मॅनेजमेंट डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या शब्दात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!